Canada Bans Handguns: '...पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अ‍ॅक्शन मोडमध्ये'

कॅनडात (Canada) अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी हँडगनच्या स्वामीत्वावर बंदी घालणारे विधेयक आणले आहे.
Prime Minister of Canada Justin Trudeau
Prime Minister of Canada Justin TrudeauDainik Gomantak
Published on
Updated on

Canada Government Big Decision: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अमेरिकेत सतत होणारे हल्ले आणि हँडगनमुळे होणारे मृत्यू पाहता आपल्या देशात अनेक कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. कॅनडात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी हँडगनच्या स्वामीत्वावर बंदी घालणारे विधेयक आणले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हँडगनची खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. मात्र, हे विधेयक मंजूर करणं ट्रुडोंसाठी सोपं नसेल. (The Prime Minister of Canada Justin Trudeau has introduced a bill banning the ownership of handguns)

पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो (Justin Trudeau) यांनी या विधेयकासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आमचे सरकार देशात हँडगनच्या मालकीवर बंदी घालण्यासाठी विधेयक आणत आहे. या अंतर्गत, कॅनडामध्ये कुठेही हँडगनची खरेदी, विक्री, हस्तांतरण किंवा आयात करण्यास पूर्णपणे बंदी असेल.

Prime Minister of Canada Justin Trudeau
Canada : आंदोलकांनी घराला घेराव घालताच पंतप्रधान कुटुंबासह पळाले

गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे

दुसरीकडे, एप्रिल 2020 मध्ये कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया गावात सामूहिक गोळीबार झाला होता. यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. यानंतर सरकारने (Government) 1500 प्रकारच्या शस्त्रांवर बंदी घातली होती, मात्र एकमेकांवर गोळीबार आणि बंदुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लोकांना मारण्याच्या किंवा जखमी करण्याच्या घटनांमध्ये 5 पटीने वाढ झाली आहे.

Prime Minister of Canada Justin Trudeau
US-Canada सीमेवर थंडीमुळे नवजात बालकासह भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

त्यामुळे सरकार हे पाऊल उचलत आहे

वास्तविक, हँडगन हल्ल्यांच्या घटना केवळ अमेरिकेतच (America) नाही तर कॅनडामध्येही (Canada) वाढत आहेत. शहर परिसरात गोळ्या झाडल्या गेलेल्या सुमारे दोन तृतीयांश गुन्ह्यांमध्ये फक्त हँडगनचा वापर करण्यात आला. अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याचे कॅनडाचे पोलिसांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री मार्को मेंडिसिनो यांचा अंदाज आहे की, देशात सुमारे 1 दशलक्ष हँडगन आहेत. या आकड्याची दशकभरापूर्वीची तुलना केली तर ती खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com