Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेने भारताकडे पुन्हा मागितली 500 दशलक्ष डॉलरची मदत

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने (Sri Lankan Cabinet) देशातील गंभीर परकीय चलनाच्या संकटादरम्यान पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीसाठी एक्झिम बँक ऑफ इंडियाकडून (Exim Bank of India) 500 दशलक्ष डॉलर्सची कर्ज मागणी मंजूर केली आहे. विशेष म्हणजे, 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

आयातीसाठी डॉलरच्या तुटवड्यामुळे देशात जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रचलित आर्थिक परिस्थितीत, ऊर्जा मंत्र्यांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीसाठी भारतीय एक्झिम बँकेकडून 500 दशलक्ष कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे कॅबिनेट नोटमध्ये म्हटले आहे.

श्रीलंकेने आधीच भारतीय बँकांकडून कर्ज घेतले आहे

ऊर्जा मंत्री कंचना विजेसेकेरा यांनी सांगितले की, श्रीलंकेला तेल खरेदीसाठी एक्झिम बँक ऑफ इंडियाकडून 500 दशलक्ष आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 200 दशलक्षाची मदत करण्यात आली आहेत. जूनपासून श्रीलंकेला सध्याच्या परकीय चलनाच्या संकटात इंधन आयातीसाठी 530 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स लागतील असा अंदाज आहे.

श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ

संकटग्रस्त श्रीलंकेने मंगळवारी पेट्रोलच्या दरात 24.3 टक्के आणि डिझेलच्या दरात 38.4 टक्के वाढ केली. परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटात इंधनाच्या दरात झालेली ही विक्रमी वाढ आहे.

भारताने श्रीलंकेला पेट्रोल पाठवले

भारताने सोमवारी सांगितले की त्यांनी श्रीलंकेला सुमारे 40,000 मेट्रिक टन पेट्रोल दिले आहे. यापूर्वी 2 एप्रिल रोजी भारताने 40,000 टन डिझेल श्रीलंकेला पाठवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT