चीन-तैवानमध्ये युद्ध होणार का? वाचा संपूर्ण प्रकरण

रशिया (Russia) -युक्रेन युद्धामध्ये आणखी एक युद्ध सुरु झाले आहे.
China-Taiwan
China-TaiwanDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया-युक्रेन युद्धामध्ये आणखी एक युद्ध सुरु झाले आहे. हे युद्ध जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक चीन आणि त्याचा शेजारी देश तैवान यांच्यात होऊ शकते. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे वक्तव्यही समोर आले आहे. क्वाड बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचलेल्या बायडन यांनी तैवानवर चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी कारवाई करेल, असे म्हटले आहे. (China Taiwan Is China Going To Invade Taiwan Why Joe Biden Said To Take Military Action To Defend Taiwan)

जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण, शेवटी चीन आणि तैवानमध्ये (Taiwan) युद्धासारखी परिस्थिती का आहे? चीनची (China) योजना काय आहे आणि त्याबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा अर्थ काय

China-Taiwan
Quad Summit 2022: PM मोदी राहणार उपस्थित, क्वाड म्हणजे काय अन् चीन का घाबरतो?

पहिल्यांदा जाणून घ्या तैवान आणि चीनमध्ये काय चालले आहे?

वास्तविक, एक ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर चीन आणि तैवानमधील युद्धाची चर्चा वाढत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चीनचे वरिष्ठ अधिकारी तैवानवरील हल्ल्याबाबत बोलत होते. ही ऑडिओ क्लिप चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लीक केल्याचे बोलले जात आहे. त्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची तैवानवर हल्ला करण्याची योजना उघड करायची होती. या क्लिपमध्ये एक अधिकारी दुसऱ्याला सांगत आहे की, कोणत्या कंपन्यांना ड्रोन आणि बोटींची उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. हल्ल्याच्या तयारीचीही चर्चा होत आहे.

China-Taiwan
भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार ? चीनकडून पँगॉन्ग तलावावर पुन्हा बांधकाम

तैवानवर हल्ला करण्याची चीनची योजना काय आहे?

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये तैवानवरील हल्ल्याच्या नियोजनाचीही चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार तैवानला लागून असलेल्या ग्वांगडोंग प्रांताला 20 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये युद्धाशी संबंधित 239 साहित्य जमा करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये 1.40 लाख लष्करी कर्मचारी, 953 जहाजे, 1,653 मानवरहित उपकरणे, 20 विमानतळांना गोदींशी जोडणाऱ्यांचा समावेश आहे.

China-Taiwan
ड्रॅगन VS अमेरिका, जगभरातील टॅलेंटला चीन करतोय आकर्षित

चीन आणि तैवानमध्ये युद्ध झाले तर कोणाला पाठिंबा देणार?

परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आदित्य पटेल म्हणाले, 'चीन आणि तैवानमध्ये युद्ध झाले तर भारतासह अनेक देशांसमोर पुन्हा संभ्रम निर्माण होईल. मात्र, या बाबतीत काही देशांची रणनीती अगदी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, अमेरिका, नाटोचे सदस्य देश आणि अनेक पाश्चात्य देश तैवानला उघडपणे पाठिंबा देतील. त्याचवेळी रशिया चीनसोबत जाऊ शकतो.

China-Taiwan
चीन, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

पटेल पुढे म्हणाले, 'भारतासाठी ही एक गंभीर परिस्थिती असेल, कारण भारताने रशिया-युक्रेनमध्ये अंतर राखले असले तरी चीन-तैवानमध्ये तसे करणे फार कठीण जाईल. कारण चीन आणि भारत यांच्यात नेहमीच वाद होत आले आहेत. अशा परिस्थितीत तैवानची भारताने साथ दिली नाही तर अनेक देश भारतासोबतच्या युद्धाच्या वेळीही भारताला साथ देणे टाळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com