Sri Lanka Economic Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Economic Crisis: लंकेची आर्थिक स्थिती सुधारणार, राष्ट्रपतींनी खर्च कमी करण्याचे दिले आदेश

Sri Lanka Budget: 1948 मध्ये ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सर्व मंत्रालयांना यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या अंदाजे खर्चात 5 टक्क्यांनी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. श्रीलंकेचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. देशाचे आर्थिक संकट पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच खोल असल्याचे मानले जात आहे. 1948 मध्ये ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

सरकारी तिजोरीतील पैसा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे

श्रीलंकेच्या (Sri Lanka) परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली आहे. परकीय चलनाच्या संकटामुळे श्रीलंकेने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय कर्ज चुकवण्याची घोषणा केली होती. पत्रकारांना संबोधित करताना, वाहतूक मंत्री बंदुला गुणवर्धने म्हणाले की, राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी मंत्रिमंडळाला कळवले आहे की, सरकारी तिजोरीतील निधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

आर्थिक संकट अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर

गुणवर्धने म्हणाले की, '2023 च्या पहिल्या काही महिन्यांत कराच्या माध्यमातून खूप काही कमावता आले असते. मात्र गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या आर्थिक संकटामुळे त्यात मोठी कपात झाली आहे. ते पुढे म्हणाले की, 'आमच्या अंदाजापेक्षा आर्थिक संकट अधिक गंभीर आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात (Budget) विविध मंत्रालयांनी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये 5 टक्के कपात करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाला दिले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employees) जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पगाराचे संकट निर्माण झाले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT