Gotabaya Rajapaksa|Sri Lanka Political Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Explained: श्रीलंकेचे राष्ट्रपती 13 जुलैलाचं का देत आहेत राजीनामा?

Sri Lanka Political Crisis: श्रीलंकेत अभूतपूर्व राजकीय अराजकता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानाची कब्जा करून तोडफोड केली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या कुटुंबासह निवासस्थानातून पळ काढला आहे. श्रीलंकातील संसदेचे अध्यक्ष महिंद्रा यापा अभयवर्ध यांनी शनिवारी रात्री माहिती दिली की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 13 जुलै रोजी राजीनामा देणार आहेत. (Sri Lanka Crisis Gotabaya Rajapaksa News)

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण 9 जुलै रोजी राष्ट्रपतींविरोधात श्रीलंकेत निदर्शनं पाहता राष्ट्रपती आपल्या पदावर राहू शकत नाहीत, असे संकेत यापूर्वीच मिळाले आहेत. या वादात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राजीनामा देण्यासाठी 13 जुलै हा दिवस का निवडला?या मागचे कारण जाणुन घेउया

* बौद्ध धर्माशी हे विशेष संबंध

राष्ट्रपती गोटाबाया यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी 13 जुलै या तारखेची निवड का केली याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही. पण 13 जुलैला पौर्णिमा (Purnima) असुन या दिवसाचे बौद्ध धर्मीयांसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे. ज्याला सिंहलीमध्ये 'पोया' असे म्हणतात. श्रीलंकेत (Sri Lanka) प्रत्येक 'पोया' दिवसाला सार्वजनिक सुट्टी असते.

श्रीलंकेमध्ये थेरवाद बौद्ध धर्माचे पालन केले जाते. थेरवडा बौद्ध कॅलेंडरमध्ये जुलै महिन्यातील पौर्णिमा 'एसला पोया' म्हणून साजरी केली जाते. बुद्धांचा पहिला उपदेश आणि बौद्ध धर्माची स्थापना बौद्ध करतात. भगवान बुद्धांनी वयाच्या 35 व्या वर्षी वाराणसीजवळील (Varanasi) सारनाथ येथील डीअर पार्कमध्ये इ.स.पूर्व 528 मध्ये पहिला उपदेश दिला. बुद्धाने पहिला उपदेश पाच संन्याशांना दिला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे कट्टर बौद्ध आहेत. 2019 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, फक्त सिंहली-बौद्धांनी त्यांना मतदान केले होते.

* बॅल्क जुलै

श्रीलंकेच्या इतिहासात जुलै हा नेहमीच असामान्य महिना राहिला आहे. 1983 मध्ये 24-30 जुलै दरम्यान झालेल्या तमिळविरोधी नरसंहारानंतर जवळपास चार दशकांपासून हा महिना "ब्लॅक जुलै" (Black July) म्हणून साजरा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT