Prison Gang War Dainik Gomantak
ग्लोबल

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Sri Lanka Negombo Prison Riot Casualties: श्रीलंकेतील एका मुख्य तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या अत्यंत भीषण आणि हिंसक चकमकीत 4 तुरुंग सुरक्षा रक्षकांसह 23 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Sri Lanka Negombo Prison Riot Casualties: श्रीलंकेतील एका मुख्य तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या अत्यंत भीषण आणि हिंसक चकमकीत 4 तुरुंग सुरक्षा रक्षकांसह 23 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या रक्तरंजित संघर्षात 100 हून अधिक कैदी आणि सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील श्रीलंकेच्या कोणत्याही तुरुंगातील हा सर्वात घातक आणि हिंसक दंगा मानला जात आहे. हा जीवघेणा संघर्ष कोलंबोच्या उत्तरेला असलेल्या नेगोम्बो शहरातील मुख्य तुरुंगात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी तुरुंगात सक्रिय असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीचे कैदी एका कारणावरुन परस्परांशी भिडले. पाहता पाहता या वादाचे रुपांतर एका मोठ्या दंग्यात झाले आणि रात्रभर तुरुंगाच्या आत हिंसेचा नंगा नाच सुरु होता. नेगोम्बो सरकारी रुग्णालयाच्या संचालिका पुष्पा गमलथ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रुग्णालयात आतापर्यंत 23 मृतदेह आणण्यात आले आहेत. याशिवाय गंभीर जखमी झालेल्या 100 हून अधिक कैद्यांवर आणि रक्षकांवर तातडीने उपचार सुरु आहेत.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, जखमींपैकी अनेकांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण आहेत, तर अनेक कैदी धारदार शस्त्रांच्या हल्ल्यामुळे आणि गंभीर जखमांमुळे तडफडत आहेत. रुग्णालयाचे प्रशासन जखमी कैद्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळीही तुरुंगाच्या आतून मधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. तुरुंगात सुरु असलेल्या या खूनी लढाईची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरातील सुरक्षा व्यवस्था कोलमडली आणि तणाव वाढला.

तुरुंगातील ही परिस्थिती तेव्हा अधिक गुंतागुंतीची आणि चिंताजनक बनली, जेव्हा तुरुंगाच्या महिला (Women) वॉर्डमध्ये बंद असलेल्या महिला कैद्यांनीही अचानक मोठा गदारोळ सुरु केला. त्या आपल्या सुटकेची मागणी करत थेट बॅरेकच्या छतावर चढल्या आणि घोषणाबाजी करु लागल्या. या गोंधळादरम्यान छताचा एक मोठा हिस्सा अचानक कोसळला, ज्यामुळे काही महिला कैदी ढिगार्‍याखाली चिरडून गंभीर जखमी झाल्या. तुरुंग प्रशासनाने आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराची मदत मागितली असून नेगोम्बो शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT