Cyber Crime In Sri Lanka: श्रीलंकेत सायबर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या 60 भारतीयांना अटक; 135 मोबाईल आणि 57 लॅपटॉप जप्त!

Indians Arrested in Srilanka: श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यात सहभागी असलेल्या 60 भारतीय नागरिकांना अटक केली आहे.
Cyber Crime: श्रीलंकेत सायबर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या 60 भारतीयांना अटक; 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉप जप्त!
Indians Arrested in SrilankaDainik Gomantak

श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या 60 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. गुरुवारी मडीवेला, बट्टारामुल्ला आणि नेगोम्बो या पश्चिम किनारपट्टीवरील शहरांमधून या लोकांना अटक करण्यात आली.

पोलिस प्रवक्ते एसएसपी निहाल थलदुवा यांनी सांगितले की, गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या भागात एकाच वेळी छापेमारी केली, ज्यामध्ये 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉप जप्त केले.

'डेली मिरर लंका' या वृत्तपत्राने वृत्त दिले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे, ज्याने आरोप केला की सोशल मीडियावर संपर्क साधून रोख रक्कम देण्याचे आश्वासन देऊन त्याला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले.

वृत्तानुसार, पेरादेनिया येथील एका व्यक्तीने आणि त्याच्या मुलाने फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याचे कबूल केले. नेगोम्बो येथील एका आलिशान घरावर टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांवरुन 13 संशयितांना सुरुवातीला अटक (Arrested) करण्यात आली, ज्यांच्याकडून 57 फोन आणि संगणक जप्त करण्यात आले.

Cyber Crime: श्रीलंकेत सायबर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या 60 भारतीयांना अटक; 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉप जप्त!
भारत, बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळच्या 186 नागरिकांना Maldives करणार हद्दपार, चीनच्या एकाही नागरिकाचा समावेश नाही

त्यानंतर नेगोम्बोमध्ये केलेल्या छापेमारीत आणखी 19 लोकांना अटक करण्यात आली, ज्यामुळे या टोळीचे दुबई (Dubai) आणि अफगाणिस्तानमधील आंतरराष्ट्रीय संबंध उघड झाले. पीडितांमध्ये स्थानिक आणि परदेशी दोघांचाही समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे. आर्थिक फसवणूक, बेकायदेशीर सट्टा, जुगार अशा विविध कामांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com