Senior Officer Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर, हल्ल्यात भारतीय अधिकारी जखमी

Sri Lanka: श्रीलंकेत तैनात असणारे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी हल्ल्यात जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत तैनात असणारे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, भारतीय उच्चायुक्तांनी ट्वीट करुन श्रीलंकेतील भारतीय नागरिकांना देशातील ताज्या घडामोडींची माहिती ठेवण्याचे आणि त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, असेही म्हटले आहे.

दरम्यान, दुसर्‍या ट्विटमध्ये उच्चायुक्तालयाने म्हटले की, ''सकाळी आमच्या अधिकार्‍यांनी भारतीय नागरिक आणि भारतीय व्हिसा केंद्राचे संचालक विवेक वर्मा यांची भेट घेतली. जे काल रात्री कोलंबोजवळ एका हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते." ही बाब श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचेही उच्चायुक्तांनी सांगितले आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर

विशेष म्हणजे, श्रीलंका (Sri Lanka) सध्या राजकीय अस्थिरतेच्या काळातून जात आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी जनतेच्या प्रचंड विरोधाला तोंड देत देश सोडून पळ काढला. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणाही केली. ते सध्या सिंगापूरमध्ये (Singapore) आहे. तर दुसरीकडे, रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आणीबाणीची घोषणा

20 जुलै रोजी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी काळजीवाहू राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात आणीबाणीची (Emergency) घोषणा केली. श्रीलंकेला सर्वात मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT