Sri Lanka Bus Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Bus Accident: श्रीलंकेत भीषण अपघात! बस खोल दरीत कोसळल्याने 21 जणांचा मृत्यू; 30 हून अधिक जण जखमी

Sri Lanka Road Tragedy: श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील कोटमाले भागात रविवारी (11 मे) एक भीषण अपघात झाला. बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

Manish Jadhav

श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील कोटमाले भागात रविवारी (11 मे) एक भीषण अपघात झाला. बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अनेकांना बसमधून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले.

अपघात कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रांतातील कोटमाले भागात बस डोंगराळ रस्त्यावर डावीकडे वळण्याचा प्रयत्नात असताना हा अपघात (Accident) झाला. बस सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळली. राज्य परिवहन संस्थेच्या या बसमध्ये 75 लोक होते. त्यांना दक्षिणेकडील तीर्थक्षेत्र कटारागामा येथून वायव्येकडील कुरुनेगाला शहरात नेले जात होते.

21 जणांचा मृत्यू

दरम्यान, या अपघातात 21 जणांना आपला जीव गमवावा लागला तर सुमारे 30 हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अनेक लोकांना वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाल्याचे उपमहामार्ग मंत्री प्रसन्ना गुणसेना यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात वेग आणि खराब रस्त्याची परिस्थिती ही घटनेचे कारण असल्याचे समोर आले आहे. तपासकर्ते यांत्रिक बिघाड किंवा चालकाचा निष्काळजीपणा असण्याची शक्यता देखील तपासत आहेत. दुसरीकडे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिस (Police) आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरु केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रस्ते विकास प्राधिकरण सुरक्षेतील कोणत्याही त्रुटींसाठी घटनास्थळाची तपासणी करेल. श्रीलंकेत अलिकडच्या काही महिन्यांतील हा सर्वात मोठा रस्ते अपघात आहे, ज्यामुळे वाहतूक सुरक्षितता अधिक कडक करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT