SpaceX Starship
SpaceX Starship Dainik Gomantak
ग्लोबल

Starship Rocket Explodes: जगातील सर्वात मोठ्या रॉकेटचा प्रक्षेपणानंतर हवेत स्फोट, SpaceX चा दुसरा प्रयत्नही अयशस्वी

Manish Jadhav

SpaceX Starship: मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवण्यासाठी तयार करण्यात आलेले जगातील सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली रॉकेटचा गुरुवारी प्रक्षेपित झाल्यानंतर आकाशात स्फोट झाला.

भारतीय वेळेनुसार हे गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता टेक्सासमधील बोका चिका येथील खाजगी SpaceX स्पेसपोर्ट स्टारबेसवरुन प्रक्षेपित करण्यात आले. अपयश आले तरी स्पेसएक्स कंपनीने शास्त्रज्ञांना (Scientists) प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान, एलन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या कंपनी स्पेसएक्सने ट्विट केले की, स्टारशिपच्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. टीम डेटाचे पुनरावलोकन करत राहील आणि पुढील फ्लाइट चाचणीसाठी काम करेल. रॉकेटचे लाँचपॅडवरुनच उड्डाण करण्यात मोठे यश असल्याचेही यात म्हटले आहे.

शिकण्याची संधी मिळाली, भविष्यात यश मिळेल

स्पेसएक्स कंपनीने सांगितले की, 'आजचे प्रक्षेपण रोमहर्षक नव्हते. परंतु अशी चाचणी आम्हाला पुढील यशासाठी मदत करेल. आजची चाचणी आम्हाला स्टारशिपची विश्वासार्हता सुधारण्यास मदत करेल, कारण SpaceX जीवन बहु-ग्रहीय बनवू पाहत आहे.'

स्फोट का झाला?

खरंच, स्टारशिप कॅप्सूल उड्डाणाच्या तीन मिनिटांत पहिल्या टप्प्यात रॉकेट बूस्टरपासून वेगळे व्हायला हवे होते. पण ते वेगळे झाले नाही आणि रॉकेटचा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी रॉकेट 33 किमी उंचीवर होते.

रॉकेट किती मोठे होते माहित आहे?

स्टारशिप हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट होते, जे मानवांना चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे पाठवण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते. त्याची उंची 394 फूट, व्यास 29.5 फूट आहे. हे रॉकेट दोन भागात विभागले गेले आहे. वरच्या भागाला स्टारशिप म्हणतात. त्याची उंची 164 फूट आहे. यासाठी 1200 टन इंधन लागते. दुसरा भाग खूप भारी आहे. हे 226 फूट उंच रॉकेट आहे. हे स्टारशिपला उंचीवर घेऊन जाईल.

स्टारशिपची पहिली चाचणी उड्डाण पूर्ण करण्याचा SpaceX चा हा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या टप्प्यातील बूस्टरमधील दाबामुळे रॉकेटचे लिफ्ट-ऑफ नियोजित प्रक्षेपणाच्या 10 मिनिटांपूर्वी रद्द करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT