Elon Musk बनले ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती, बराक ओबामांना सोडले मागे

ट्विटरचे सीईओ एलन मस्क हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती बनले आहेत, त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकले आहे.
Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak

Twitter CEO Elon Musk: ट्विटरचे सीईओ एलन मस्क हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती बनले आहेत, त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकले.

अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk), ज्यांनी गेल्या वर्षी ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले होते, त्यांचे आता ओबामा यांच्या 133,042,819 च्या तुलनेत 133,068,709 फॉलोअर्स आहेत.

113 दशलक्ष ट्विटर फॉलोअर्ससह जस्टिन बीबर आणि 108 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्ससह कॅटी पेरी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

(Elon Musk overtakes Obama as most followed Twitter user)

ट्विटर विकत घेतल्यानंतर वेगाने लोकप्रियता वाढली

मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये 100 दशलक्ष फॉलोअर्स गाठले आणि तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ओबामा क्वचितच ट्विट करतात, विशेषत: एखादा सोशल मेसेज देण्यासाठी ते ट्विट करतात. मात्र, मस्क जगातील ट्रेंडिंग असलेल्या जवळजवळ सर्व विषयांवर ट्विट करतात.

Elon Musk
Elon Musk: एलन मस्कच्या नावावर अनोखा विक्रम, 200 अब्ज डॉलर गमावणारा...

दुसरीकडे, मस्क यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की, मी माझे अकाऊंट हे पाहण्यासाठी प्रायव्हेट करत आहे की, फॉलोअर्समध्ये किती पटीने वाढ झाली आहे.

त्यांनी पुढे पोस्ट केली की, मी हे तपासण्यासाठी अकाऊंट प्रायव्हेट केले की, माझ्या सार्वजनिक ट्विटच्या तुलनेत प्रायव्हेट ट्विट किती प्रमाणात पाहिले गेले.

याचा अर्थ फक्त मस्क यांचे फॉलोअर्सच त्यांचे ट्विट पाहू शकत होते, मात्र ते रिट्विट करु शकत नव्हते. त्यांचे ट्विट पूर्वीइतके लोक पाहत नसल्याच्या यूजर्सच्या तक्रारींमुळे हे समोर आले. मात्र, नंतर त्यांनी त्यांच्या अकाऊंटमधील प्रायव्हेट सेटिंग काढून टाकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com