Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: किम जोंग उनचा काय हाय इरादा, एका दिवसात डागली 17 क्षेपणास्त्रे

Kim Jong-un: उत्तर कोरियाने बुधवारी पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर एकामागून एक एकूण 17 क्षेपणास्त्रे डागली आहेत.

दैनिक गोमन्तक

North Korea: उत्तर कोरियाने बुधवारी पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर एकामागून एक एकूण 17 क्षेपणास्त्रे डागली, असा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. उत्तर कोरियाने एकाच दिवसात 17 क्षेपणास्त्रे डागल्यानंतर दक्षिण कोरियाला अलर्ट करण्यात आला आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर या बेटावर हवाई हल्ल्याचा इशारा दिल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियानेही (South Korea) लगेच प्रत्युत्तर देत हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या हल्ल्यांपूर्वी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत संयुक्त लष्करी सराव करण्यावरुन अमेरिकेवर टीका केली होती. उत्तर कोरियाने (North Korea) प्रत्युत्तरादाखल अधिक आक्रमक कारवाई करण्याचा इशारा मंगळवारी दिला होता.

उलेयुंग बेटावर क्षेपणास्त्र पडले

दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात म्हटले की, उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी वोनसानच्या पूर्व किनारपट्टीवरुन क्षेपणास्त्रे डागली. ज्यामध्ये एक क्षेपणास्त्र (Missile) दक्षिण कोरियाच्या उलेंग बेटाच्या वायव्येस 167 किलोमीटर (104 मैल) आंतरराष्ट्रीय पाण्यात पडले. यानंतर दक्षिण कोरियानेही हवाई हल्ल्याबाबत अलर्ट जारी केला.

बेटावर राहणारे लोक भूमिगत

दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी बेटावर राहणाऱ्या लोकांना भूमिगत आश्रयस्थानात नेले जात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्व सागरी सीमेपासून क्षेपणास्त्र ज्या भागात उतरले ते 26 किलोमीटर (16 मैल) आहे. मात्र, ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून खूप दूर आहे. 1948 मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एखादे क्षेपणास्त्र सागरी सीमेच्या इतक्या जवळ पडल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे.

दक्षिण कोरिया म्हणाला- आम्ही सहन करणार नाही

दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात म्हटले की, "हे अस्वीकार्य आहे. आम्ही ते सहन करणार नाही." त्याचवेळी दक्षिण कोरियाने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रांची चाचणी करुन त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

SCROLL FOR NEXT