North Korea launch missile
North Korea launch missile Dainik Gomantak

North Korea-South Korea: उत्तर कोरियाने डागली 3 क्षेपणास्त्रे, दक्षिण कोरियात वाजू लागले सायरन

दक्षिण कोरियाने बोलावली आपात्कालीन बैठक; जपान सरकारही अलर्टवर
Published on

North Korea-South Korea: हुकुमशहा किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियाने बुधवारी डागलेल्या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांमुळे पुर्व आशियाला युद्धाच्या तोंडावर आणून ठेवले आहे. या क्षेपणास्त्रांमुळे दक्षिण कोरिया आणि जपान या शेजारी राष्ट्रांमध्ये हडकंप माजला. उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे दोन्ही शेजारी देश चिडले आहे.

North Korea launch missile
Twitter Blue Tick Price: आता ट्विटरवर ब्लु टिकसाठी प्रत्येक महिन्यात मोजावे लागणार 'इतके' रूपये

या क्षेपणास्त्रांमुळे दक्षिण कोरियातील अनेक शहरात बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक रेड सायरन वाजू लागले. दक्षिण कोरियाच्या मते उत्तर कोरियातील वॉनसन किंवा त्याच्या आसपासहून ही क्षेपणास्त्रे सोडली गेली असावीत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:51 मिनिटांनी अर्ली वार्निंग सिस्टमने याची माहिती दिली. हे क्षेपणास्त्र उत्तरेकडील सीमा रेषेजवळ समुद्रात पडले.

तर एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियातील सोक्चो शहरापासून 57 किलोमीटर लांब समुद्रात पडले. तिसरे मिसाईल उलेलुंग बेटाकडे गेले, त्यामुळे या भागात रेड सायरन वाजू लागले. लोकांना सुरक्षितस्थळी पोहचता यावे, यासाठी पुर्वसूचना देणारे हे अलार्म आपोआप वाजू लागतात. या क्षेपणास्त्रांनंतर उत्तर कोरियाने आणखी विविध प्रकारची किमान 10 क्षेपणास्त्रे डागली.

North Korea launch missile
Iran May Attack On Saudi: तिसरे महायुद्ध भडकणार? इराण सौदी अरेबियावर हल्ला करण्याच्या तयारीत

सोमवारपासून सुरू झालेल्या दक्षिण कोरिया-अमेरिका यांच्यातील 5 दिवसीय संयुक्त हवाई युद्धसरावाच्या पार्श्वभुमीवर उत्तर कोरियाकडून ही क्षेपणास्त्रे डागली गेल्याचा संशय़ आहे.

दक्षिण कोरियाने बोलावली आपत्कालीन बैठक

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यओल यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी उत्तर कोरियाची कृती भडकावणारी असून यावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. तर दक्षिण कोरियाच्या सैन्याने म्हटले आहे की, अशी भडकाऊ कृती सहन केली जाणार नाही. अमेरिकेसोबत घनिष्ठ संबंध ठेवण्यासह याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

जपान सरकार अलर्टवर

दरम्यान, जपानच्या पंतप्रधान कार्यालयानेही या मिसाईल हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जपान सरकार अलर्टवर असून सर्व सैन्य दलांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com