North Korea tests Missile: अमेरिका, जपान अशा बड्या राष्ट्रांना फाट्यावर उत्तर कोरियाने आपल्या विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने कुणालाही न जुमानता नुकतेच आणखी एक बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली.
हे बॅलेस्टिक मिसाईल उत्तर कोरियाने त्यांच्या पुर्वेकडील समुद्रात डागले. विशेष म्हणजे या समुद्राला जपानचा समुद्र म्हणूनही ओळखले जाते. या महिन्याभरात उत्तर कोरियाने केलेली हा सातवी मिसाईल टेस्ट आहे.
4 ऑक्टोबर रोजी उत्तर कोरियाने जपानच्या हवाईहद्दीतून मिसाईल डागले होते. त्यानंतर दोन दिवसांनी बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी घेतली होती. ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाने वारंवार मिसाईलची चाचणी घेतली आहे.
काही दिवसांपुर्वीच किम जोंग उन यांच्या पाहणीखाली उत्तर कोरियाने दोन न्युक्लियर क्रुझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीनंतर किम जोंग उन यांनी, आम्ही अणुचाचणीच्या दिशेने जात आहोत, असा गर्भित इशारा दिला होता. ही दोन्हे क्षेपणास्त्रे दीर्घ पल्ल्याची असून २००० किलोमीटर इतकी त्यांची रेंज आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत.
विशेष म्हणजे, क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानने उत्तर कोरियाला वारंवार इशारे दिले आहेत. एकदा तर जपानमध्ये पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी देशात इमर्जन्सी अलर्ट जारी केला होता. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या युद्धसरावाला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाकडून गेल्या काही काळात क्षेपणास्त्रे डागली जात होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.