Singapore Passport Dainik Gomantak
ग्लोबल

World's Most Powerful Passport in 2023: जगातील शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग जाहीर, जपानला मागे टाकत सिंगापूर अव्वल; जाणून घ्या भारताची रॅंकिंग

World's Most Powerful Passport in 2023: 2023 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? सर्वात शक्तिशाली पासपोर्टचे फायदे काय आहेत?

Manish Jadhav

World's Most Powerful Passport in 2023: 2023 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? सर्वात शक्तिशाली पासपोर्टचे फायदे काय आहेत? भारताची क्रमवारी काय आहे? चीन किंवा पाकिस्तान क्रमवारीत कोणत्या नंबरवर आहेत? टॉप-3 क्रमवारीत कोणते देश आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीत मिळतील, नवीन हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जारी झाला आहे.

दरम्यान, लंडनची इमिग्रेशन कन्सल्टन्सी हेन्ली अँड पार्टनर्स दरवर्षी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. 2023 ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत जपान (Japan) पहिल्या क्रमांकावर नसण्याची सुमारे 5 वर्षांनंतर ही पहिलीच वेळ आहे.

सिंगापूरने जपानला मागे टाकले

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, या वर्षी सिंगापूरचा (Singapore) पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून समोर आला आहे. सिंगापूर पासपोर्ट्सवर तुम्ही जगातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकता. या यादीत जपानची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

जपानी पासपोर्ट्सवर तुम्ही व्हिसाशिवाय 189 देशांमध्ये प्रवास करु शकता. या यादीत जर्मनी, इटली आणि स्पेन हे युरोपातील 3 देश दुसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही देशांचे पासपोर्ट असलेले लोक जगातील 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.

जपानबरोबरच ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडनचे पासपोर्टही तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील देश

पासपोर्ट इंडेक्सनुसार, चौथा शक्तिशाली पासपोर्ट डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड आणि युनायटेड किंगडमचा आहे. दुसरीकडे, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, माल्टा, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडचे पासपोर्ट असलेले लोक 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. ते क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

भारत 80 व्या स्थानी

तसेच, या इंडेक्सनुसार भारताचे स्थान 80 वे आहे. भारतीय पासपोर्ट असलेले लोक जगातील 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. या यादीत भारताचा शेजारी देश चीनची रँकिंग 63 आहे, तर पाकिस्तानची रँकिंग 100 आहे. चीनचे लोक 80 देशांमध्ये तर पाकिस्तानचे लोक 33 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT