Most Popular Leader In World: लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM मोदींचा बोलबाला, अनेकांना मागे टाकत...

Global Leader Approval Ratings: पॉप्युलर ग्लोबल लीडर्सच्या ताज्या यादीत जगातील सर्व नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Prime Minister Narendra Modi: पॉप्युलर ग्लोबल लीडर्सच्या ताज्या यादीत जगातील दिग्गज नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टने एक सर्वेक्षण केले आहे.

त्यांच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये, पीएम मोदींनी ऋषी सुनक, जो बायडन यांच्यासह 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकत सर्वात लोकप्रिय नेत्याचा किताब जिंकला आहे. सर्वेक्षणात 78 टक्के रेटिंगसह पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर आहेत. त्यांना 68 टक्के रेटिंग मिळाले आहे. लोकप्रियतेच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज 58 टक्के रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Prime Minister Narendra Modi
World's Most Expensive Home: सौदी प्रिन्सचा आलिशान राजवाडा, 'एवढ्या किमतीत लोक...'

दुसरीकडे, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 52 टक्के रेटिंग मिळाले. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लालू डी सिल्वा 50 टक्के रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सहाव्या तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सातव्या क्रमांकावर आहेत. दोघांना 40 टक्के रेटिंग मिळाले आहे.

त्याचबरोबर, ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक 30 टक्के रेटिंगसह 16 व्या क्रमाकांवर आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान 29 टक्के रेटिंगसह 17 व्या क्रमांकावर आहेत.

Prime Minister Narendra Modi
'भारत-अमेरिका चांगले मित्र', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने का टवकारले अनेकांचे कान?

तसेच, मॉर्निंग कन्सल्टंटने ज्या 22 देशांच्या सर्वोच्च नेत्यांना स्थान दिले आहे, ते हे देश आहेत- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, स्वीडन (Sweden), स्पेन, दक्षिण कोरिया, पोलंड, नॉर्वे, नेदरलँड, मेक्सिको, जपान, इटली, आयर्लंड, भारत, जर्मनी, फ्रान्स , झेक प्रजासत्ताक, कॅनडा, ब्राझील, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com