Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Bangladesh Corruption Case: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या सर्वेसर्वा शेख हसीना यांना देशातील कायदेशीर आणि राजकीय स्तरावर मोठा धक्का बसला.

Manish Jadhav

Sheikh Hasina 21 Years Sentence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या सर्वेसर्वा शेख हसीना यांना देशातील कायदेशीर आणि राजकीय स्तरावर मोठा धक्का बसला. बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 21 वर्षांची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता आणखी वाढली, कारण शेख हसीना सध्या देश सोडून भारतात आहेत. जोपर्यंत त्या बांगलादेशात परत जात नाहीत, तोपर्यंत सरकारला या शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नाही.

मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा

भ्रष्टाचाराच्या (Corruption) शिक्षेपूर्वी, शेख हसीना यांना बांगलादेशात मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि गंभीर कायदेशीर आघात ठरला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधात झालेल्या प्रचंड विरोध प्रदर्शनांदरम्यान केलेल्या ‘‘मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’’ त्यांना दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी 17 नोव्हेंबर रोजी एका विशेष न्यायाधिकरणाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

फाशीची शिक्षा का?

महिनाभर चाललेल्या या महत्त्वाच्या खटल्यानंतर बांगलादेशच्या विशेष न्यायाधिकरणाने आपल्या अंतिम निर्णयात 78 वर्षीय अवामी लीग नेत्या शेख हसीना यांना हिंसक दडपशाहीच्या “मास्टरमाइंड” म्हणून घोषित केले. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारी दडपशाहीत शेकडो आंदोलकांना आपला जीव गमवावा लागल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

विशेष न्यायाधिकरणाने दिलेल्या या कठोर निर्णयानंतर अवामी लीग पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला. पक्षाने हा निर्णय मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने घेतलेल्या राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुकीतून शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी युनूस सरकारच्या इशाऱ्यावर हा निर्णय घेण्यात आला, असा अवामी लीगचा स्पष्ट आरोप आहे.

अवामी लीगचे देशव्यापी विरोध आणि आंदोलन

शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या विशेष न्यायाधिकरणाला अवैध आणि असंवैधानिक ठरवत, अवामी लीगने त्याचा निर्णय पूर्णपणे फेटाळून लावला. या विरोध प्रदर्शन मोहिमेअंतर्गत अवामी लीगने थेट अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेख हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या विरोधात त्यांची पार्टी अवामी लीग, 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण बांगलादेशात आंदोलने आणि प्रतिरोध मोर्चे काढणार आहे. या देशव्यापी आंदोलनाची घोषणा पक्षाने मंगळवारी केली.

एकाच वेळी भ्रष्टाचार आणि मानवता विरुद्धच्या गुन्ह्यांसाठी कायदेशीर पेचात अडकलेल्या शेख हसीना यांच्या भवितव्यावर आता अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. बांगलादेशचे राजकीय वातावरण या निर्णयामुळे अधिक अस्थिर झाले असून फेब्रुवारीमधील निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

SCROLL FOR NEXT