Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Indus Water Treaty: "सिंधू जल करार सस्पेंड करुन तुम्ही मोठी चूक केली!", शाहबाज शरीफची भारताला युद्धाची धमकी; पाकड्यांचा पुन्हा तिळपापड

Shehbaz Sharif War Threat To India: पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच, देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला थेट युद्धाची चिथावणी देणारे आक्रमक विधान केले. `

Manish Jadhav

Shehbaz Sharif War Threat To India: पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच, देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला थेट युद्धाची चिथावणी देणारे आक्रमक विधान केले. इस्लामाबाद येथील ‘यादगार-ए-फतह’ या विशेष कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित करत भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली. पाकिस्तानसाठी सिंधू नदीच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा 'रेड लाईन' असून, भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा प्रयत्न सुरुच ठेवल्यास त्याला चोख आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शरीफ यांनी दिला.

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. या निर्णयामुळे पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखले गेले असून तेथील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेचा संदर्भ देत शरीफ म्हणाले की, पाकिस्तान (Pakistan) शांतता आणि सन्मानाचा पुरस्कार करतो, परंतु याचा अर्थ देश कमकुवत आहे असा होत नाही.

जर भविष्यात भारताने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर मे 2025 पेक्षाही अधिक तीव्र आणि शक्तिशाली उत्तर दिले जाईल. एप्रिल 2025 मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानात एअरस्ट्राइक करत मोठे नुकसान पोहोचवले, ज्याला पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले.

आपल्या भाषणात शरीफ यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले. ट्रम्प यांनी योग्य वेळी मध्यस्थी करुन मोठी भूमिका बजावली आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले, असा दावा शरीफ यांनी केला. जरी भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला असला तरी तेच सत्य असल्याचे त्यांनी म्हटले.

याशिवाय, चीन हा नेहमीच पाकिस्तानचा खरा मित्र राहिला असून दोन्ही देशांची मैत्री हिमालयापेक्षाही उंच असल्याचे शरीफ यांनी नमूद केले. तसेच, सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबत झालेले संरक्षण करार हे मुस्लिम आणि अरब जगतात शांततेचा संदेश देणारे असल्याचे सांगत त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT