PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan PM Shehbaz Sharif: शाहबाज शरीफ सोडणार खुर्ची? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाबाबत आली मोठी बातमी!

Pakistan News: पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ मायदेशी परतल्यानंतर चौथ्यांदा पंतप्रधान होतील.

Manish Jadhav

Shehbaz Sharif, Nawaz Sharif: पाकिस्तानातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. यातच आता, पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ मायदेशी परतल्यानंतर चौथ्यांदा पंतप्रधान होतील.

द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पीएमएल-एन केंद्रीय महापरिषदेने येथे झालेल्या बैठकीत शाहबाज यांची पुढील चार वर्षांसाठी पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड केली.

पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी मायदेशी परतल्यानंतर पीएमएल-एनचे अध्यक्षपद नवाझ शरीफ यांच्याकडे सोपवणार असल्याचे सांगितले आहे.

नवाझ शरीफ हे आधुनिक पाकिस्तानचे निर्माते: शाहबाज

शाहबाज पुढे म्हणाले की, 'नवाझ शरीफ हे आधुनिक पाकिस्तानचे निर्माते आहेत, ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात ऊर्जा टंचाई दूर केली, रस्त्यांचे जाळे उभारले, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, कृषी, उद्योग आणि अर्थव्यवस्थेतील इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास केला.'

या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 'प्रकृती स्वास्थामुळे नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये स्व-निर्वासित असलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या पाकिस्तानात (Pakistan) परत येण्याची ते वाट पाहत आहेत.'

पक्षाची महत्त्वाची बैठक का बोलावली?

शरीफ पुढे म्हणाले की, 'निवडणूक आयोगाची (Election Commission) टांगती तलवार आहे, म्हणूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.'

त्यांचे पूर्ववर्ती नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर आणि पक्षाचे कोणतेही पद धारण करण्यास मनाई केल्यानंतर शाहबाज यांना पीएमएल-एनचे अध्यक्षपद देण्यात आले. पीएमएल-एनला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीय नकाशा बदलेल : शाहबाज

शाहबाज पुढे असेही म्हणाले की, 'नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर राजकारणात मोठा बदल झालेला दिसेल.'

जिओ न्यूजच्या बातमीनुसार, आपल्या कारभाराबद्दल बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन दिली की, त्यांच्या सरकारने अशा वेळी कार्यभार स्वीकारला आहे, जेव्हा पाकिस्तान राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

ते शेवटी म्हणाले की, 'महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. आघाडी सरकारने एकत्रितपणे ठरवले की, आपण कठीण प्रसंगांना तोंड देऊ.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT