SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn Dainik Gomantak
ग्लोबल

SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn: ''मी एअर इंडियावर बहिष्कार टाकण्याबाबत....'', गुरपतवंत सिंग पन्नूचा यूटर्न

Gurpatwant Singh Pannun UTurn: शीख फॉर जस्टिसचा प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कारवाईमुळे घाबरला आहे.

Manish Jadhav

SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn: शीख फॉर जस्टिसचा प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कारवाईमुळे घाबरला आहे. त्यामुळे एअर इंडियाचे विमान उडवण्याची धमकी त्याने मागे घेतली आहे. त्याचा सूर बदलला आहे.

माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगत त्याने नवा व्हिडिओ जारी केला आहे. मी एअर इंडियावर बहिष्कार टाकण्याबाबत बोललो होतो, फ्लाइट उडवण्याची धमकी दिली नव्हती. गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाचे फ्लाइट उडवण्याची धमकी दिली होती.

19 नोव्हेंबर रोजी शीखांना एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास टाळण्याचा सल्ला त्याने दिला होता. त्याने दिल्लीचे आयजीआय विमानतळ उडवून देण्याची धमकीही दिली होती.

भारताने पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पन्नूने आता शिखांना मेसेज देण्यासाठी नवा व्हिडिओ शेअर केला आहे. पन्नूच्या म्हणण्यानुसार 1 डिसेंबर 2023 पासून टोरंटो विमानतळ आणि व्हँकुव्हर विमानतळावर एअर इंडियावर (Air India) बहिष्कार टाकून नवीन मोहीम सुरु केली जाईल. याआधी 4 नोव्हेंबरला पन्नूने दिल्ली विमानतळाचे नाव बदलण्याची मागणी करणारा व्हिडिओही जारी केला होता.

दुसरीकडे, पन्नू सातत्याने धमक्या देत आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील तणाव वाढतच आहे. दरम्यान, अमेरिकेच्या भूमीवर पन्नू याची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा एका ब्रिटिश मीडिया हाऊसने केला आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी, भारतावर पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही प्रत्युत्तर दिले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला प्रत्युत्तर दिले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत आणि अमेरिकेने नुकतीच दोन्ही देशांच्या सुरक्षेबाबत चर्चेदरम्यान गुन्हेगार आणि दहशतवाद्यांबद्दल काही माहिती शेअर केली होती. ही माहिती दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब आहे. दोघांनीही त्याच्यावर आवश्यक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत (India) ही माहिती गांभीर्याने घेत आहे कारण त्याचा परिणाम देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होत आहे. NIA ने पन्नूविरुद्ध IPC च्या कलम 120B, 153A, 506 आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 10, 13, 16, 17, 18, 18B आणि 20 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची 46 कनाल शेतजमीन आणि चंदीगडच्या सेक्टर 15 मधील त्याचे घर जप्त करण्यात आले आहे. एनआयएने पन्नूविरोधात लुक आऊट सर्क्युलरही जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

Goa Rain Update: गोव्यात मुसळधार! राज्यात चार दिवस यलो अलर्ट; महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले

Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

SCROLL FOR NEXT