Russia Ukraine War:  
ग्लोबल

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चला निघालेल्या नागरिकांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; 7 मृत्यू, 90 जखमी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pramod Yadav

Russia Ukraine War: रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला असून, 90 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूज वेबसाईट अल्जजीराच्या रिपोर्टनुसार, युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहरात हा हल्ला झाला.

चर्चमध्ये निघालेल्या नागरिकांवर हा हल्ला झाला आहे. जखमींमध्ये 12 मुले आणि 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. रशियाने आणखी एक दिवस दुःख आणि वेदनात बदलला आहे. रशियन हल्ल्यात एक पॉलिटेक्निक विद्यापीठ आणि एक थिएटर उद्ध्वस्त झाले आहे. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या जनरलची भेट घेतली तेव्हा हा हल्ला झाला.

क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी रशियन सैन्याने 17 इराणी शाहेद ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला. त्यापैकी 15 ड्रोन पाडण्यात आले. असा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. तर, युक्रेनने मॉस्कोवर हल्ला करण्यासाठी पाठवलेले ड्रोन नष्ट करण्यात आले असा दावा रशियाने केला आहे. असे वृत्त रॉयटर्सच्या वतीने देण्यात आले आहे.

सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की स्वीडनमध्ये आहेत. स्वीडनमधून त्यांना युद्धासाठी कॉम्बॅट व्हेईकल सीव्ही-90 मिळणार आहेत.

अमेरिकेने युक्रेनला F-16 लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, नेदरलँड आणि डेन्मार्क वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही लढाऊ विमाने युक्रेनला देतील, असे वॉशिंग्टनने म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेन अनेक दिवसांपासून रशियाविरुद्धच्या युद्धासाठी लढाऊ विमानांची मागणी करत आहे. यासाठी 11 देशांच्या वतीने युक्रेनच्या वैमानिकांना लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या महिन्यापासून हे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा! इंडिगोचं विमान अचानक रद्द, संतापलेल्या विदेशी महिलेनं काउंटरवर चढून केला राडा Watch Video

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

SCROLL FOR NEXT