PM Modi And Putin Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

PM Modi Trends On Chinese Social Media: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा फक्त भारत किंवा अमेरिका-ब्रिटनपर्यंतच मर्यादित नाही, तर त्यांनी जगभरातील देशांवर आपली छाप पाडली आहे.

Manish Jadhav

PM Modi Trends On Chinese Social Media: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा फक्त भारत किंवा अमेरिका-ब्रिटनपर्यंतच मर्यादित नाही, तर त्यांनी जगभरातील देशांवर आपली छाप पाडली आहे. आता या यादीत चीनचे नावही सामील झाले आहे. पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत सहभाग घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि जिनपिंग यांनीही त्यांचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. यानंतर, पंतप्रधान मोदी चीनी सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. तेथील 'ट्विटर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेइबो (Weibo) वर फक्त त्यांचीच चर्चा सुरु आहे.

पंतप्रधान मोदींच्या या दोन दिवसांच्या चीन (China) दौऱ्यासाठी त्यांना एक अत्यंत प्रतिष्ठित आणि खास 'मेड इन चायना' हाँगकी (Hongqi) कार दिली गेली. विशेष म्हणजे, चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील आपल्या अधिकृत दौऱ्यांसाठी याच कारचा वापर करतात. याशिवाय, आणखी एक रंजक बाब म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी हे एकाच कारमध्ये बसून बैठकीसाठी गेले. ही कार होती ऑरस (Aurus), जी पुतिन यांची अधिकृत कार आहे. या कारवर चीनी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट लावण्यात आली होती, जी दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध दर्शवते.

चीनी सोशल मीडियावर पीएम मोदींचा बोलबाला

पंतप्रधान मोदी पुतिन यांच्या कारमध्ये बसल्याच्या क्षणापासूनच ते चीनी 'ट्विटर' वेइबोवर ट्रेंड करु लागले. ‘मोदींनी पुतिनची कार घेतली’ हा ट्रेंड सध्या वेइबोवर पहिल्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त, चीनी सर्च इंजिन बाइदू (Baidu) वरही सध्या सर्वात जास्त सर्च होणारे नाव पंतप्रधान मोदी यांचेच आहे. ‘मोदी आणि पुतिन यांनी गळाभेट घेतली आणि हातात हात घालून बोलले’ हा विषय बाईदूवरील टॉप ट्रेंडमध्ये आहे. यावरुन स्पष्ट होते की, चीनी लोक केवळ त्यांचीच चर्चा करत आहेत.

SCO बैठकीत मोदींनी दहशतवादावर साधला निशाणा

तसेच, या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलेले भाषण. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवाद हा जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला आणि भारत गेल्या चार दशकांपासून दहशतवादाला तोंड देत असल्याचे म्हटले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "दहशतवादाचा विरोध करणे हे मानवतेप्रती आपले कर्तव्य आहे." त्यांनी जागतिक समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींचा हा चीन दौरा केवळ औपचारिक नव्हता, तर तो त्यांच्या जागतिक नेतृत्वाची आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रभावाचीही साक्ष देणारा ठरला. त्यांचे हे परराष्ट्र धोरण आणि जागतिक नेत्यांसोबतचे त्यांचे वैयक्तिक संबंध भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करत आहेत, हे यावरुन दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sara Tendulkar: शुभमन गिलला दिला धोका? सारा गोव्यात कोणासोबत करतेय मज्जा? 'त्या' तरुणासोबतचे फोटो झाले VIRAL

सांगोडोत्सव गाजला! मांडवीच्या पाण्यावर रंगला 'खुनी हनिमून', 'छावा' आणि ‘शरभ अवतार' देखाव्यांची जोरदार चर्चा; Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

SCROLL FOR NEXT