PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

PM Modi Red Fort Speech: नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, या सर्व वस्तूंवरील जीएसटीचा आढावा घेतला जाईल, त्यानंतर कोणत्या वस्तूवर किती जीएसटी दर लागू होईल हे ठरवले जाणार आहे.
PM Modi employment scheme for youth
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी तरुण आणि व्यावसायिकांसाठी दोन खास घोषणा केल्या. तरुणांसाठी मोदींनी पंतप्रधान विकास भारत रोजगार योजना जाहीर केली. यामुळे सुमारे ३.५ लाख तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. ही योजना आजपासूनच सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी जीएसटीबाबत देखील एक मोठी घोषणा केली. दिवाळीपासून आमचे सरकार एक नवीन जीएसटी सुधारणा घेऊन येत आहे, ज्याअंतर्गत सध्याच्या जीएसटी दरांचा आढावा घेतला जाईल. तसेच, कर स्लॅब देखील दुरुस्त केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या देशात जीएसटी अंतर्गत अनेक प्रकारचे कर स्लॅब आहेत, प्रत्येक वस्तूंनुसार त्यात बदल होतो. नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, या सर्व वस्तूंवरील जीएसटीचा आढावा घेतला जाईल, त्यानंतर कोणत्या वस्तूवर किती जीएसटी दर लागू होईल हे ठरवले जाणार आहे.

PM Modi employment scheme for youth
Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर! तलवार बंधू अजून फरारच; नववा संशयित गजाआड

सध्या देशात जीएसटी स्लॅब ०%, ५%, १२%, १८%, २८% असे आहेत. याशिवाय, मौल्यवान धातूंवर ०.२५% आणि ३% चे विशेष दर देखील लागू आहेत. हा कर स्लॅब कमी केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना मत व्यक्त केले.

या योजनेतून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पहिल्यांदाच १५,००० रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. पहिला हप्ता ६ महिने पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल.

PM Modi employment scheme for youth
Bhutani Project: भूतानी प्रकल्पाबाबत नवी अपडेट! सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाकडून निकाल राखीव

या योजनेअंतर्गत रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही मदत केली जाणार आहे. कंपन्यांना या योजनेअंतर्गत अनुदानाच्या स्वरूपात मदत देखील दिली जाईल. या योजनेअंतर्गत कंपन्यांना प्रति कर्मचारी ३००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. तथापि, कर्मचाऱ्याची नोकरी ६ महिने टिकेल याची खात्री कंपनीला द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com