Schools Reopen in Sri Lanka संग्रहित
ग्लोबल

Schools Reopen in Sri Lanka : इंधनाअभावी बंद करण्यात आलेल्या श्रीलंकेतील शाळा अखेर पुन्हा सुरू

शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. संपूर्ण बेटावर इंधनाचा तुटवडा असूनही, सोमवारी शाळकरी मुलांसाठी पुरेशा संख्येने बस सेवा सुरू करण्यात आल्या.

दैनिक गोमन्तक

संकटग्रस्त श्रीलंकेत इंधनाच्या कमतरतेमुळे 4 जुलैपासून बंद असलेल्या देशभरातील शाळा आता सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. संपूर्ण बेटावर इंधनाचा तुटवडा असूनही, सोमवारी शाळकरी मुलांसाठी पुरेशा संख्येने बस सेवा सुरू करण्यात आल्या.

लंका प्रायव्हेट बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जेमुनु विजेरत्ने यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणांहून इंधनाची आवक झाली आहे. राष्ट्रीय परिवहन आयोगाचे महासंचालक निलन मिरांडा यांनी सांगितले की, प्राप्त झालेल्या इंधनाच्या प्रमाणानुसार विद्यार्थ्यांसाठी बसेस सेवेत आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

(Schools Reopen in Sri Lanka)

7000 टन इंधन 25 जुलैला होणार वितरित

ऑल सिलोन स्कूल चाइल्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षा मालाश्री सिल्वा यांच्या मते, श्रीलंका ट्रान्सपोर्ट बोर्ड (SLTB) डेपोमधून पुरेसे इंधन मिळत असल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी आणखी व्हॅन बसवण्यात आल्या आहेत. सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC) ने सोमवारी जाहीर केले की 25 जुलै रोजी देशभरात 7,000 टन इंधन वितरीत केले जाईल.

सहा आंदोलकांच्या परदेश प्रवासावर बंदी

त्याचवेळी, श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काही महिन्यांपासून सरकारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सहा निदर्शकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. श्रीलंकेच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारच्या दृष्टिकोनाबाबत देशभरात निदर्शने होत आहेत.

कामगार संघटनेच्या नेत्यासह सहा कार्यकर्त्यांवर जूनच्या मध्यात बेकायदेशीरपणे जमलेल्या जमावाचा भाग असल्याचा आरोप आहे आणि त्यांना अटक केल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT