Hijab  Dainik Gomantak
ग्लोबल

Protest Against Hijab: इराणमध्ये आता शाळकरी विद्यार्थिनींचाही हिजाबविरोधात एल्गार

आंदोलनात आत्तापर्यंत 154 मृत्यू; 16 सप्टेंबरला सुरू झालेले आंदोलन पोहचले 9 प्रांतात

गोमन्तक डिजिटल टीम

Protest Against Hijab: इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाबला विरोध सुरू झाला असून त्याविरोधात मोठे आंदोलन पेटले आहे. या आंदोलनात आता शाळकरी विद्यार्थिनीही उतरल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनीही आंदोलकांवरील कारवाई गतिमान केली असून आत्तापर्यंत या आंदोलनात 154 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत इराणमधील विद्यार्थिनी इराणचे राष्ट्रापती इब्राहिम रईस यांचे फोटो तुडवताना दिसत आहेत. राष्ट्रपती रईसी हे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभप्रसंगी तेहरानच्या अल जाहरा विद्यापीठात बोलताना म्हणाले की, शत्रुंना वाटते की, ते विद्यापीठात त्यांचा हेतू साध्य करतील. पण आपले शिक्षक, विद्यार्थी जागरूक असल्याची त्यांना कल्पना नाही. आंदोलकांचे कारस्थान यशस्वी होणार नाही. या भाषणानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचे समजते.

सुरक्षा यंत्रणांकडून शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापरही केला जात आहे. त्यात कुर्दिस्तानची राजधानी सानंदज येथे पोलिसांनी एका कार ड्रायव्हरला गोळी मारली आहे. तसेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या आंदोलकांचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे.

इराणमधील मानवाधिकार समुहाच्या माहितीनुसार पोलिस कारवाईत सानंदज येथील एका शाळेतील दोन शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. 16 सप्टेंबरपासून हे हिजाबविरोधी आंदोलन इराणमध्ये सुरू आहे. कुर्द प्रांतातून सुरू झालेला हा विरोध आता इराणच्या 9 प्रांताच पोहचला आहे. तेहरान, अल्बोर्ज, इस्फहान, फारस, करमान, खोरासन, अझरबैझान आणि गीलान येथेही सरकारच्या महिलाविरोधी धोरणांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT