North Korea Fires Missiles: उत्तर कोरियाने पुन्हा डागली दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे; द. कोरिया, जपानमध्ये तणाव

जपानमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी; दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका यांच्यात फोनवरून चर्चा
North Korea launch new missile
North Korea launch new missile Dainik Gomantak
Published on
Updated on

North Korea Fires Missiles: उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी सातत्याने इशारा देऊनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी सुरूच आहे. त्यामुळे आता उत्तर कोरियाच्या शेजारील देश सतर्क झाले आहेत. जपानमध्ये या चाचणीनंतर इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

North Korea launch new missile
Elon Musk: चीन-तैवान वाद कसा मिटणार? एलन मस्क यांनी सुचविला उपाय

गेल्या काही दिवसात उत्तर कोरियाने शेजारी देश असलेल्या जपानवरून क्षेपणास्त्रे डागली आहेत. विशेष म्हणजे, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत उत्तर कोरियाने ही दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

गेल्या काही दिवसात उत्तर कोरियाने एका मागोमाग एक अशी अशी अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे शेजारील देश सतर्क झाली आहेत. या भागात तणावही निर्माण झाला आहे. जपानचमध्ये पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी उत्तर कोरियाच्या या कृतीनंतर देशात इमर्जन्सी अलर्ट जारी केला आहे.

North Korea launch new missile
Nobel Peace Prize 2022: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीसह दोन संघटनांना जाहीर

जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, याबाबत त्यांचे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही उत्तर कोरियाची सातवी क्षेपणास्त्र चाचणी असून असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा जपानने दिला आहे.

तर दक्षिण कोरियानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे हे कृत्य उकसवणारे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने या चाचण्यानंतर उत्तर कोरियावर नवे निर्बंध लागू केले आहेत. तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाने समुद्रात युद्धसरावदेखील केला.

अमेरिकेपासून स्वसंरक्षणासाठीच क्षेपणास्त्र चाचण्या : उत्तर कोरिया

अमेरिकन सैन्याने याबाबत म्हटले आहे की, आम्ही सहकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. रॉयटर या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार उत्तर कोरियाने या वर्षात २४ क्षेपणास्त्रांचे परिक्षण केले आहे. या बाबत उत्तर कोरियाने निवेदनही जारी केले आहे. अमेरिकेपासून असलेल्या सैन्य कारवाईच्या धोक्यामुळे स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्र चाचण्या केल्याचे उत्तर कोरियाने या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com