Holy Place of Makka Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia Bus Accident: मक्केला जाणाऱ्या बसचा अपघात; 20 जणांचा मृत्यू

Saudi Arabia: या अपघातात जीव गमावलेले 20 लोक जगाच्या विविध भागातले होते

दैनिक गोमन्तक

20 People died in Mecca Saudi Arabia Bus Accident: इस्लाम धर्मामध्ये रमजानच्या महिन्याला विशेष महत्व असते. या महिन्यात अनेक मुस्लिम बंधूभगिनी मक्केच्या यात्रेला जाण्याला पसंती देतात. आता सौदी अरेबियातून मक्केला जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला असून 13 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाडी भागात बसचा ब्रेक फेल झाला आणि एका पुलाला जाऊन धडकली आणि बसला आग लागली.

रमजानच्या महिन्यात, उमरासाठी मक्केला जातात. मक्का ही मुस्लिमांचे पवित्र स्थळ मानले जाते. या काळात सौदी अरेबियाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसून येते. त्यामुळे मोठे अपघातही पाहायला मिळतात. यादरम्यान, ट्रॅफिक( Traffic ) जॅमच्या समस्याही दिसून येतात.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात जीव गमावलेले 20 लोक जगाच्या विविध भागातले होते. संपूर्ण जगभरातून या अपघातानंतर दुख व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT