Pakistan Economic Crises Medicine Shortage: पाकिस्तानला गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती. नागरिकांना दैनंदीन गरजेच्या वस्तूंसाठीदेखील वणवण भटकण्याची वेळ निर्माण झाली होती.
महागाईने उच्चांक गाठल्याने नागरिक मोठ्या समस्यांचा सामना करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अन्नटंचाईनंतर आता पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
औषधांच्या तुटवड्यानंतर नकली औषधे आणि त्यांची तस्करीचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानमध्ये औषधांच्या किंमतीवरुन स्वास्थ मंत्रालय आणि औषध उद्योग यांच्यामध्ये विवाद सुरु आहे. परिणामस्वरुप आता औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, नागरिक( Citizen ) औषधांच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठी किंमत देऊन औषधे खरेदी करण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. पाकिस्तानचे शहबाज सरकार महागाई कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे.
परकीय गंगाजळी कमी झाल्याने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान( Pakistan )ने अनेक प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.