Saudi Flight Technical Glitch: गेल्या काही दिवसांपासून हवाई प्रवासात घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लखनऊमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटना गुरुवारी झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर घडल्याने हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सौदी अरेबियातून हज यात्रेकरूंसह सुमारे २५० प्रवासी घेऊन निघालेले सौदी अरेबिया एअरलाइन्सचं विमान रविवारी (१५ जून ) लखनऊमध्ये तांत्रिक बिघाडामुळे उतरले. लखनऊ विमानतळावर सकाळी सुमारे ६:५० वाजता हे विमान उतरत असताना, त्याच्या डाव्या चाकातून धूर निघत असल्याचे दिसून आले.
फ्लाइटराडार२४च्या माहितीनुसार, जेद्दाहहून रात्री १०:४५ वाजता निघालेले हे एअरबस A330-343 विमान होते. चाकातील हा बिघाड हायड्रॉलिक प्रणालीतील गळतीमुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुवारी (१२ जून) अहमदाबादमध्ये बोइंग 787-8 ड्रीमलायनर एअर इंडियाचे विमान एका इमारतीवर कोसळले होते, ज्यात एका प्रवाशाव्यतिरिक्त इतर सर्वजण मृत्युमुखी पडले होते.
या घटनेने देशात विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता निर्माण केली असतानाच, आता लखनऊमधील या घटनांनी ही चिंता आणखी वाढवली आहे.
या घटना विमान कंपन्यांसाठी आणि नियामक मंडळांसाठी मोठे आव्हान निर्माण करत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.