Saad Khattak launched Pakistan Aam Aadmi Movement Twitter
ग्लोबल

पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने घेतला केजरीवालांचा आदर्श; PAAM ची स्थापना

पाकिस्तानचे निवृत्त मेजर जनरल यांनी हा पाकिस्तान आम आदमी चळवळ नवा पक्ष स्थापन केला आहे.

दैनिक गोमन्तक

इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाला सत्तेत येऊन पाच वर्षेही झाली नाहीत, तर पर्यायी राजकारणाचीही चर्चा पाकिस्तामध्ये सुरू झाली आहे. पाकिस्तानातही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीच्या (AAP) धर्तीवर आम आदमी चळवळ उभी राहिली आहे. पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आणि निवृत्त मुत्सद्दी मेजर जनरल साद खट्टक यांनी पाकिस्तान आम आदमी चळवळ (PAAM) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. खट्टक (Saad Khattak) यांच्या मते कुटुंबवादाचे राजकारण (Politics) संपवून सर्वसामान्यांना सत्तेवर आणणे हा या पक्षाचा उद्देश आहे.

खटक हे श्रीलंकेत पाकिस्तानचे (Pakistan) उच्चायुक्त होते. आपल्या 35 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत खट्टक यांनी विविध ऑपरेशनल प्रशिक्षण, नेतृत्व आणि असाइनमेंटवर काम केले. ते बलुचिस्तान आणि FATA मध्ये सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. पाकिस्तानामधील स्थानिक वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, कराची प्रेस क्लबमध्ये त्यांच्या पक्षाच्या लाँचिंग सोहळ्याला संबोधित करताना खट्टक म्हणाले की, 'त्यांचा पक्ष खरा लोकप्रतिनिधी म्हणून उदयास येईल आणि सामान्य लोकांना सत्तेवर आणेल. हा पक्ष इतर पक्षांप्रमाणे सामान्य जनतेचा वापर आपल्या निहित स्वार्थासाठी करणार नाही.'

देशात सत्तेवर बसलेल्या लोकांनी सामान्य माणसाला राजकारणात अप्रासंगिक बनवले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'कुटुंब, सरंजामदार आणि भांडवलदारांचे वर्चस्व असलेले राजकारण संपवून राजकारणात नवोदितांना संधी देण्याची वेळ आली आहे,' असे ते या सभेमध्ये बोलत होते. निवृत्त जनरल यांनी पीएएएम (PAAM) हे सामान्य माणसाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि श्रीमंतांचे वर्चस्व संपविण्याची चळवळ असल्याचे म्हटले आणि हा पक्ष देशातील व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. यावेळी खट्टक यांनी पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले, "सध्याची न्यायव्यवस्था न्याय देण्यात अपयशी ठरली आहे. आधुनिक, जबाबदार आणि प्रभावी न्यायव्यवस्था स्थापन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जेव्हा अधिकारांचे विभाजन खालच्या पातळीपर्यंत पोहचेल तेव्हाच खरी सुधारणा होईल, असा त्यांचा आग्रह होता.

पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष इम्तियाज अहमद यांनी म्हटले आहे की, 'PAAM हा खरा लोकशाही पक्ष म्हणून उदयास येईल, ज्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षप्रमुखपदासाठी निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. राजकारणाच्या माध्यमातून देशात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या तरुण आणि महिलांसाठी हे एक योग्य व्यासपीठ आहे.'

यावेळी PAAM च्या नेत्यांनी पक्षाचा जाहीरनामाही पत्रकारांसमोर शेअर केला. जाहीरनाम्यात ई-गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, तरुणांचे सक्षमीकरण, पर्यावरण, कायदा आणि सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्था यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. PAAM ची नोंदणी नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे झाली. आणि रविवारी या पक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT