Russia Vs Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनच्या 'या' मागणीने पुतिन यांना टेन्शन

Akshay Nirmale

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. इतके महिने उलटूनही युद्धाच्या शेवटाचा काहीच थांग लागत नाही, अशी परिस्थिती आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. दरम्यान, युक्रेनने नुकत्याच केलेल्या मागणीमुळे आता रशियाचे टेन्शन वाढणार आहे.

युक्रेनला संयुक्त राष्ट्र संघटनेत रशिया नको आहे. रशियाला संयुक्त राष्ट्रातून बाहेक काढावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे. सध्या, रशिया हा संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य आहे, रशियाकडे व्हेटो पॉवर देखील आहे. व्हेटो पॉवर म्हणजे नकाराधिकाराची शक्ती. आता ती शक्ती संपवण्यासाठीच युक्रेन ही मागणी करत आहे.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगाला आमचा एकच प्रश्न आहे. रशियाला संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य होण्याचा अधिकार आहे का? याचे उत्तर आमच्याकडे आहे आणि ते 'नाही' असे आहे. युक्रेनची ही मागणी व्लादिमीर पुतिन यांना जगात आणखी एकटे पाडण्याचे काम करू शकते. यूएन ही एक मोठी संस्था आहे आणि तिथे घेतलेल्या निर्णयांचा सर्व देशांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत रशियाला त्या संघटनेतून बाहेर फेकले गेले तर रशियाची ताकद अनेक पटींनी कमी होईल.

गेल्या काही दिवसांपासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी आणखी शस्त्रे मागितली होती. त्यानंतर अमेरिकेने युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेवर व्लादिमीर पुतिन यांच्याकडूनही तिखट प्रतिक्रिया उमटल्या. युक्रेनमधील अमेरिकेच्या सर्व पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या जातील, असा पुतीन यांचा आग्रह होता. त्याचा मुकाबला करण्यासाठी रशियाकडे S-300 प्रणाली आहे, जी अमेरिकन शस्त्रास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, असेही पुतीन म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT