China vs Taiwan: चीनची दादागिरी! तैवानच्या हद्दीत घुसून केला युद्धसराव; 71 लढाऊ विमानांची घुसखोरी

अमेरिकेच्या चिथावणीला हे प्रत्युत्तर असल्याचा चीनचा तैवानला इशारा
China vs Taiwan
China vs TaiwanDainik Gomantak
Published on
Updated on

China vs Taiwan: चीनने गेल्या 24 तासांत तैवानजवळ 71 लढाऊ विमानांसह सागरी आणि हवाई कवायती केल्या आहेत. यामध्ये 60 हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने हा चीनचा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर, अमेरिकेच्या चिथावणीच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून या हवाई आणि सागरी कवायती करण्यात आल्याचे चिनी लष्कराने म्हटले आहे. तथापि, चिनी सैन्याने त्यांना चिथावणी देण्यासाठी अमेरिकेने नेमके काय केले हे मात्र सांगितलेले नाही.

China vs Taiwan
Nepal New PM: पुष्प कमल दहल प्रचंड नेपाळचे नवे पंतप्रधान, तिसऱ्यांदा घेणार शपथ

चीनची अधिकृत वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सनुसार, अमेरिकेने आपल्या संरक्षण बजेटमध्ये तैवानसाठी 82 हजार कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे म्हटल्याची बातमी आहे. चीन हे अजिबात सहन करणार नाही, असेही त्या बातमीत म्हटले आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर सांगितले आहे की, चीनने पाठवलेल्या लढाऊ विमानांमध्ये 6 SU-30, H-6 बॉम्बर आणि आण्विक हल्ल्यात वापरात येणाऱ्या खास ड्रोनचा समावेश आहे. चीनने 47 वेळा तैवानच्या हवाई हद्दीत आपल्या लढाऊ विमानांसह घुसखोरी केली. अल जझीराच्या वृत्तानुसार, या युक्त्यांनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात तैवानने म्हटले आहे की, चीन संपूर्ण प्रदेशाची शांतता धोक्यात आणत आहे आणि तेथील लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.

China vs Taiwan
Pakistan मधील अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची शक्यता, US दूतावासाकडून अलर्ट जारी

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनचे लष्करी प्रवक्ते शी यी म्हणाले की, आमचे सैन्य देशाच्या अखंडतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहतील. चीन आणि तैवानमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे, एएफपीच्या वृत्तानुसार, चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या हल्ल्याबाबत तैवान सतत चिंता व्यक्त करत आहे. तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी 'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, चीन आता तैवानमध्ये घुसखोरीचे निमित्त शोधत आहे.

6 डिसेंबरलाही चीनने घुसखोरी केली होती. 6 डिसेंबर रोजी सकाळी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याची पुष्टी केली. मंत्रालयाने सांगितले होते की, गेल्या 24 तासांत चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात 18 एच-6 बॉम्बर पाठवले आहेत. जो अण्वस्त्र हल्ल्यात पारंगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com