Sergey Lavrov Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाचे परराष्ट्र मंत्री येणार भारत दौऱ्यावर

लावरोव्ह हे 1 एप्रिलला दिल्लीला येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. याआधी ते चीनच्या नेत्यांची भेट घेतील. लावरोव्ह हे 1 एप्रिलला दिल्लीला येण्याची शक्यता आहे. यादरम्यान ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस याही भारत दौऱ्यावर येणार आहेत.

लावरोव्ह आणि भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची दिल्लीत भेट होणार आहे. भारतासोबत द्विपक्षीय चर्चेपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री लॅव्हरोव्ह हे चीनमध्ये (China) होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बीजिंगने आयोजित केलेली ही तिसरी बैठक आहे. यामध्ये पाकिस्तान, इराण, रशिया, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राजदूतांचा समावेश असेल.

युक्रेनच्या (Ukraine) पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील लष्करी कारवाईचा उघडपणे विरोध किंवा टीका न करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. युनायटेड नेशन्ससारख्या मंचावर भारताने घेतलेल्या भूमिकेचे रशियाने (Russia) कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT