Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: युद्धादरम्यान रशियन उपसंरक्षणमंत्र्यांची तुरुंगात रवानगी; पुतीन यांची धडक कारवाई

Russian Deputy Defense Minister Arrested: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया अधिक आक्रमकपणे युक्रेनच्या शहरांवर हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Russian Deputy Defense Minister Arrested: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया अधिक आक्रमकपणे युक्रेनच्या शहरांवर हल्ले करत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तब्बल 3 वर्षे होत आले आहेत, परंतु अद्याप कोणताही निकाल लागलेला नाहीये. दरम्यान, रशियामध्ये मोठी अनागोंदी माजली आहे. येथे रशियन लष्कराने उपसंरक्षणमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याचा आरोप आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये सुरु झालेल्या या युद्धादरम्यान पुतिन यांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. तब्बल आठ वर्षे उपसरंक्षणमंत्री या पदावर विराजमान होते. ते पूर्व युक्रेनचे प्रभारी होते. रशियाच्या सर्वोच्च तपास संस्थेने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले की, रशियाचे उपसंरक्षणमंत्री तिमुर वादिमोविच इवानोव यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्धचा तपास सुरु आहे. आठ वर्षे या पदावर विराजमान असलेल्या इवानोव यांच्यावर मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याचा आरोप आहे.

दोन वर्षांपूर्वी विरोधकांनी आरोप केले होते

दरम्यान, 2022 मध्ये दिवंगत रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या नेतृत्वाखालील रशिया अँटी करप्शन फाउंडेशनने आरोप केला होता की, इवानोव आणि त्यांचे कुटुंबीय रिअल इस्टेट, लक्झरी ट्रिप आणि डिझायनर कपड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. रशियन मीडियानेही वृत्त दिले होते की, पूर्व युक्रेनियन शहर मारियुपोलचे प्रभारी असताना इवानोव यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला. रशियन हल्ल्यानंतर पुतिन यांनी हे शहर ताब्यात घेतले.

पुतिन यांच्या आदेशानुसार कारवाई

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्थांनी उद्धृत केले की, इवानोव यांच्या अटकेचा रिपोर्ट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सादर केला होता. त्यांच्या आदेशानंतरच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांना अटकेबाबत आधीच माहिती देण्यात आली होती.

युक्रेनला अमेरिकेची मदत

दुसरीकडे, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने युक्रेनला 61 अब्ज डॉलर्सची मदत देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर अनेक डेमोक्रॅट्सनी सभागृहात आनंदोत्सव साजरा केला आणि युक्रेनचे झेंडे फडकावले. ही मदत थेट रशियाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या युक्रेनियन लष्कराला मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT