Russia Ukraine War: रशियाचं वाढलं टेन्शन; नाटो संघटनेच्या लष्करानं सीमेवर दिली दस्तक; रशियन संरक्षणमंत्री म्हणाले...

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत पाश्चात्य देश आणि नाटो संघटना युक्रेनला बंद दाराआडून मदत करत होते.
Russia President Vladimir Putin
Russia President Vladimir PutinDainik Gomantak

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत पाश्चात्य देश आणि नाटो संघटना युक्रेनला बंद दाराआडून मदत करत होते, पण आता नाटोने उघडपणे रशियाला भिडायला सुरुवात केली आहे. नाटो सैन्याने रशियाच्या सीमेवर आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. रशिया आणि नाटो यांच्यात समोरासमोर संघर्ष कधीही सुरु होऊ शकतो. यासंदर्भात रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या सीमेवर 123,000 नाटो सैनिक उपस्थित आहेत. दरम्यान, वाढता धोका पाहता रशियानेही आपली लष्करी तयारी पूर्ण केली आहे. नाटोच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी रशिया मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गला 'मिलिट्री डिस्ट्रिक्ट' म्हणून विकसित करत आहे. जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सहज सामोरं जावू लागू शकतं. अलीकडेच, नाटो सदस्य फ्रान्स आणि जर्मनीने लिथुआनियामध्ये युद्ध सराव केला.

Russia President Vladimir Putin
Russia Ukraine War: रशियन-नियंत्रित शहरावर बेछूट गोळीबार, 10 जण ठार; ढिगाऱ्याखालून पाच जणांना जिवंत काढले

नाटो सैन्य रशियाच्या जवळ आले

दरम्यान, देशाच्या सीमेवर 33,000 नाटो सैनिक, 300 रणगाडे आणि 800 आर्मर्ड व्हीकल तैनात केले आहेत, असे रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई सोइगु यांनी आपल्या निवेदनात म्हटले. तर 90,000 नाटो सैनिक विविध प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांसह सरावाच्या नावाखाली लिथुआनियामध्ये पोहोचले आहेत. नाटोच्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी आम्ही मॉस्को, लेनिनग्राड सेंट पीटर्सबर्गला मिलिट्री डिस्ट्रिक्ट म्हणून विकसित करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

Russia President Vladimir Putin
Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरावर हवाई हल्ला; 6 ठार, 10 हून अधिक जखमी

पीटर्सबर्गला शस्त्रे पाठवली

लेनिनग्राड-सेंट पीटर्सबर्गमध्ये 7000 शस्त्रे पाठवण्यात आली आहेत, असेही रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई सोइगु यांनी सांगितले. याशिवाय, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 2400 आधुनिक शस्त्रेही तैनात करण्यात आली आहेत.

युक्रेनला अमेरिकेची मदत

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने युक्रेनला 61 अब्ज डॉलर्सची मदत देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर अनेक डेमोक्रॅट्सनी सभागृहात आनंदोत्सव साजरा केला आणि युक्रेनचे झेंडे फडकावले. ही मदत थेट रशियाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या युक्रेनियन लष्कराला मदत करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com