रशियाने संपूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला आहे. तर दुसरीकडे ब्रिटन आणि अमेरिका या हल्ल्याच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांना रशिया मुठमाती देत आहे. रशियाने (Russia) केलेल्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील असे परिणाम भोगावा लागतील" असा सज्जड दम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी दिला आहे. दरम्यान त्यांच्या या इशाऱ्याचा अर्थ असा देखील घेतला जात आहे की, पुतिन थेट नाटोला इशारा देत आहेत. आणि विशेष म्हणजे अमेरिकेने (America) युक्रेनवरील (Ukraine) रशियन हल्ल्यात हस्तक्षेप करु नये, अन्यथा त्यांनाही भयंकर परिणाम भोगावे लागतील. (Russia Warns Other Countries After Attack On Ukraine)
दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, ''रशियन लष्कर युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. रशियाच्या निशाण्यावर युक्रेनच्या पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण सुविधा, लष्करी हवाई क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर लष्करी हवाई क्षेत्रांनाही रशियाकडून त्यांच्या शस्त्रास्त्रांनी लक्ष्य केले जात आहे. गुरुवारी सकाळी पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. रशियन सैन्याने क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली.''
त्याचवेळी रशियाच्या या आदेशावर अमेरिकेने जोरदार टीका केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले, ''हा हल्ला पूर्णपणे विसंगत आणि भडकावणारा आहे.'' बुधवारीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) म्हणाले होते की, 'रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो.' त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ट्विट करत म्हटले की, "युक्रेनमधील बदलणाऱ्या घडामोडी पाहून धक्का बसला आहे. मी (Ukraine) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी पुढील पावले उचलण्यासंबंधी चर्चा केली आहे."
तर, युक्रेनने भारतासह जगातील अनेक देशांना या कठीण काळात युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना धडा शिकविण्याचे देखील आवाहन केले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक नेत्यांना संरक्षण सहाय्य देण्याचे आणि रशियाला युक्रेनच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.