Russia Ukraine War News updates
Russia Ukraine War News updatesDainik Gomantak

Ukraine Russia War: युक्रेनमधील विध्वंसानंतर NATO देश अ‍ॅक्शनमध्ये !

परिस्थिती पाहता नाटो देशांनी (NATO Countries) रशियाविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे.
Published on

युक्रेनवर रशियाचा लष्करी हल्ला सातत्याने सुरु असून, युक्रेनमध्ये मोठा विध्वंस होत आहे. दरम्यान, परिस्थिती पाहता नाटो देशांनी रशियाविरोधात (Russia) कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. (NATO Countries Are Preparing To Take Action Against Russia After The Devastation In Ukraine)

मिळालेल्या माहितीनुसार, नाटोचे 30 सदस्य देश रशियावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. नाटो कलम-4 रशियाविरोधात वापरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किंबहुना, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुध्द (Ukraine) युद्ध पुकारल्यानंतरही हल्ले सुरुच आहेत. रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे. (Russia Ukraine War News updates)

Russia Ukraine War News updates
Russia-Ukraine Impact: भारतासह जगातील सर्व देशांवर कोसळणार महागाईचा डोंगर

दरम्यान, अशा स्थितीत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाटो देशांनी तातडीची बैठक बोलावली होती. आता या अंतर्गतच नाटो रशियावर प्रत्युत्तराची कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला

त्याचवेळी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris johnson) यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून इंग्लंड आणि आमचे मित्र देश योग्य ते प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे. याशिवाय जर्मनीची राजधानी असणाऱ्या बर्लिनमधील (Berlin) ब्रॅंडेनबर्ग गेटवरही युक्रेनच्या ध्वजासह एकता दाखवण्यात आली आहे.

Russia Ukraine War News updates
Russia-Ukraine Impact: भारतासह जगातील सर्व देशांवर कोसळणार महागाईचा डोंगर

हल्ल्यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याशी चर्चा केली. यासह त्यांनी फ्रान्स आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली.

तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याच्या रशियाच्या इराद्याला "विना प्रक्षोभित आणि प्रक्षोभित" म्हणून निषेध केला. अमेरिका आणि मित्र राष्ट्र यासाठी "रशियाची जबाबदारी निश्चित करतील,'' असही बायडन यांनी म्हटले आहे.

तसेच, सात देशांच्या बैठकीनंतर गुरुवारी अमेरिकन लोकांशी बोलण्याची आपली योजना असल्याचे बायडन यांनी सांगितले. गुरुवारी रशियाविरुद्ध आणखी निर्बंध जाहीर केले जाऊ शकतात.

शिवाय, बायडन यांनी लेखी निवेदनात म्हटले की, "रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्वनियोजित युद्धाची निवड केली आहे, ज्याचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम होईल." या हल्ल्यातील जीवितहानी आणि विध्वंसासाठी केवळ रशिया जबाबदार असेल, अमेरिका आणि त्याचे मित्र देश रशियाला निर्णायक पद्धतीने प्रत्युत्तर देतील. विशेष म्हणजे रशियाची जबाबदारी जग ठरवेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com