Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर डागली 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे; संपूर्ण युक्रेन अंधारात

गुरुवारी सकाळपासून संपूर्ण युक्रेनमध्ये सायरन वाजत आहेत.

Pramod Yadav

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज (29 डिसेंबर) पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराने केला आहे. गुरुवारी सकाळपासून संपूर्ण युक्रेनमध्ये सायरन वाजत आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण युक्रेनमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण संपूर्ण युक्रेन अंधारात असल्याचीही महिती आहे.

राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागात मोठा हवाई हल्ला केला आहे. एकामागून एक क्षेपणास्त्रे सातत्याने डागली जात आहेत. कीव, झायटोमिर आणि ओडेसामध्ये स्फोट ऐकू आले. असे अरेस्टोव्हिच यांनी म्हटले आहे.

रशियाने हल्ल्या केल्यानंतर, ऊर्जा व पायाभूत सुविधांचे नुकसान कमी करण्यासाठी सरकारने ओडेसा आणि निप्रॉपेट्रोव्हस्क प्रदेशांमध्ये वीज कपात जाहीर करण्यात आली.

दरम्यान, काल म्हणजेच बुधवारी रशियाने खेरसनच्या नागरी भागात 33 क्षेपणास्त्रे डागली होती. सोशल मीडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की शेजारच्या बेलारूसमध्ये तैनात असलेल्या रशियन जेटने उड्डाण केल्यानंतर देशव्यापी अलर्ट घोषित केला जाऊ शकतो. 16 डिसेंबरलाही रशियाकडून 70 क्षेपणास्त्रे डागून युक्रेनची तीन शहरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT