Vladimir Putin
Vladimir Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: बायडन यांच्या युक्रेन दौऱ्यावर भडकले पुतीन, 'आम्ही ही समस्या शांततेने...'

Manish Jadhav

Vladimir Putin Speech: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. युक्रेससोबत सुरु असलेल्या युद्धाबाबत ते म्हणाले की, "आम्ही ही समस्या शांततेने सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होतो, आम्ही शांततेने बोलत होतो, परंतु आमच्या पाठीमागे एक वेगळीच परिस्थिती तयार केली जात होती."

पुतीन यांचे हे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या युक्रेन दौऱ्याच्या एक दिवसानंतर आले आहे. आपल्या भाषणात व्लादिमीर पुतिन यांनी पश्चिमी देशांवर संघर्ष भडकावल्याचा आरोप केला.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सोमवारी अचानक कीवमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टमध्ये, झेलेन्स्की यांनी बायडन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, बायडन यांची भेट सर्व युक्रेनियन लोकांसाठी खूप खास आहे. एका वृत्तानुसार, बायडन पोलंडचे (Poland) राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते अचानक युक्रेनला पोहोचले.

पुतीन पुढे म्हणाले की, ''विशेष मोहीम सुरु होण्यापूर्वीच पाश्चात्य देश युक्रेनला हवाई संरक्षण पुरवठ्याबाबत वाटाघाटी करत होते. रशियाने वर्षानुवर्षे पाश्चिमात्य देशांशी संवाद साधण्याची तयारी दर्शविली आहे, परंतु नेहमीच दुर्लक्ष केले गेले आहे.''

दुसरीकडे, पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर आता जो बायडन काय बोलतात हे पाहावे लागणार आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 20 फेब्रुवारी रोजी बायडन युक्रेनच्या दौऱ्यावर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT