Russia-Ukraine War: भारत हे युद्ध थांबवणार? अमेरिकेने केले मोठे वक्तव्य

Russia-Ukraine War: भारताच्या कोणत्याही प्रयत्नामुळे हे युद्ध संपणार असेल तर ते स्वागताहार्य असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनचे युद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे.या युद्धामुळे रशिया आणि युक्रेन यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु या दोन्ही देशांबरोबर संपूर्ण जगाचेदेखील नुकसान झाले आहे.

आता अमेरिकेने याबाबत वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटल्यानुसार, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र मला वाटते की हे युद्ध अजूनही थांबू शकते. पुतिन हे युद्ध थांबवू शकतात.

जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारे रशिया-युक्रेनचे हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर त्यांचे आम्ही समर्थन करु असे जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. भारताच्या कोणत्याही प्रयत्नामुळे हे युद्ध संपणार असेल तर ते स्वागताहार्य असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Russia-Ukraine War
PNB: लाखमोल झाले मातीमोल, लॉकरमधल्या नोटांना लागली वाळवी

मास्कोमध्ये काही दिवसांपूर्वी भारताचे( India ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पुतिन यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर रशिया-युक्रेन( Ukraine ) युद्ध थांबण्यासाठी भारताने प्रयत्न करावे असे वक्तव्य अमेरिकेने केले आहे.

दरम्यान, युक्रेनने असे म्हटले आहे की, रशियाने हवाई हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. अमेरिके( USA )च्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्यामुळे संपूर्ण जगाचे नुकसान होत आहे. युक्रेनच्या नागरिकांच्या नुकसानाला पुतिन जबाबदार आहेत आणि पुतिनच हे थांबवू शकतात.

मात्र पुतिन युक्रेनच्या क्रुझ मिसाइल आणि उर्जा क्षेत्रावर हल्ला करण्यावर भर देत आहेत. रशिया युक्रेनच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर भर देत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

donald trump mojtaba khamenei
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
AI Chatbot False Intelligence Report US China War
MEA India Energy Security Statement US Tariff
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com