Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचे 309 दिवस; रशियाकडून क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच

रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचा वेग सातत्याने वाढवत आहे.

रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचा वेग सातत्याने वाढवत आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हवेतून तसेच समुद्रातून डझनभर क्षेपणास्त्रे डागली. यामुळे युक्रेन पुन्हा एकदा हादरले. सर्वत्र ज्वाळा उठताना दिसत होत्या आणि सगळीकडे आरडाओरडा सुरू होती. राजधानी क्वीवसह युक्रेनचे अनेक भाग गुरुवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले. (Russia Ukraine War)

Russia-Ukraine War
Taliban: 'त्याने किती बॉम्ब फेकले...,' मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्या मंत्र्यांने तोडले अकलेचे तारे

देशातील अनेक भागात गुरुवारी पहाटे हवाई हल्ल्याचे सायरन वाजायला सुरुवात झाली. युक्रेनचे लष्करी प्रमुख, जनरल व्हॅलेरी जे. यांनी सांगितले की, रशियाने पॉवर प्लांट्सवर 69 क्षेपणास्त्रे डागली, त्यापैकी 54 नष्ट झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किवच्या आसपास झालेल्या हल्ल्यात किमान दोन जण ठार झाले. त्याचवेळी या हल्ल्यात देशभरातील किमान सहा जण जखमीही झाले आहेत.

युक्रेनच्या वायुसेनेने सांगितले की, रशियाने रात्रीच्या वेळी निवडक भागात स्फोट करण्यासाठी ड्रोन पाठवले आणि त्यानंतर सकाळी आपल्या मोक्याच्या विमानातून आणि जहाजांवरून हवाई आणि समुद्रावर आधारित क्रूझ क्षेपणास्त्र हल्ले केले. युक्रेनच्या वीज आणि पाणीपुरवठ्यावर रशियाचा हल्ला इथल्या लोकांच्या त्रासात भर घालणार आहे. क्वीवमधील प्रादेशिक प्रशासनाने सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

महापौर विटाली क्ल्युश्को यांनी राजधानीतील वीज खंडित होण्याचा इशारा दिला आणि लोकांना पाणी साठवून ठेवण्यास आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज ठेवण्यास सांगितले. खार्किवचे महापौर इहोर तेरेखोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर अनेक स्फोटांनी हादरले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही रशियन क्षेपणास्त्रे नष्ट झाली आहेत.

क्वीवच्या जिल्हा प्रशासनाने सांगितले की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात डार्निटस्की येथील दोन खाजगी इमारतींचे नुकसान झाले आहे. नीपर नदीच्या पलीकडे असलेल्या परिसरात औद्योगिक सुविधा आणि खेळाच्या मैदानाचेही नुकसान झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com