Kim Jong Un & Vladimir Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? रशियाच्या उपकाराची करणार परतफेड

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता उत्तर कोरियाही युक्रेन युद्धात उडी घेणार आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता उत्तर कोरियाही युक्रेन युद्धात उडी घेणार आहे. अमेरिकेने वारंवार ताकीद देऊनही किम जोंग उन रशियाच्या मदतीला धावून आले.

दुसरीकडे, युद्धात युक्रेनने ज्या प्रकारे निकराचा लढा दिला तो वाखणण्याजोगा आहे. युक्रेनने आता मॉस्कोवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रशियाला त्याच्या जुन्या मित्राची गरज भासू लागली आहे. पुतिन यांनी स्वत: शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवले ​​पण आता त्यालाही मदतीची गरज आहे.

रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाकडे लाखो तोफगोळे आणि रॉकेट आहेत, जे रशियाला मिळाल्यास युद्धात मोठी मदत होईल.

अमेरिकेचे (America) म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत किम उन स्वत: रशियाला जाणार आहेत, जिथे पुतिन यांची भेट घेऊन कराराला अंतिम रुप देऊ शकतात.

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु जुलैमध्ये उत्तर कोरियाला गेले होते. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर उत्तर कोरियाला भेट देणारे ते पहिले नेते होते.

उत्तर कोरियावर रशियाची मर्जी!

संभाव्य किम-पुतिन करार 1950-53 मधील कोरियन युद्धाची आठवण करुन देणारा आहे, जेव्हा सोव्हिएत युनियनने (आता रशिया) कम्युनिस्ट कोरियाला शस्त्रे आणि दारुगोळा पुरवून मदत केली होती.

जर हा करार निश्चित झाला तर ते उत्तर कोरियासाठी (North Korea) रशियाच्या उपकाराची परतफेड करण्यासारखे होईल.

किमच्या दौऱ्यावर रशियाचे मौन!

किम यांच्या संभाव्य रशिया दौऱ्यावर क्रेमलिनने सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. रशियाने म्हटले की, इतर देश काय विचार करतात याची पर्वा नाही. उत्तर कोरिया हा त्याचा शेजारी आहे आणि आमचे संबंध यापुढेही वाढत राहतील.

2019 मध्ये किम जोंग उन रशियाला गेले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. मात्र, पुढे काहीही झाले नाही आणि गेल्या चार वर्षांत दोन्ही नेत्यांमध्ये गोलमेज चर्चाही झाली नाही.

दुसरीकडे, किम जोंग उन यांनी लवकरात लवकर कराराला अंतिम रुप द्यावे अशी रशियाची इच्छा आहे, जेणेकरुन पाश्चात्य समर्थक युक्रेनला युद्धात 'धडा शिकवू शकतील'.

पुतिन यांना उत्तर कोरियाला शस्त्रास्त्र तळ बनवायचा आहे, जो त्याला बिनदिक्कतपणे शस्त्रे पुरवत राहील. रशियाला आशा आहे की, किम दारुगोळा, बॉम्ब आणि इतर अवजड शस्त्रास्त्रांची मदत करेल. किम यांनी यापूर्वीही रशियाला अनौपचारिक मदत केली आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये, त्याने वॅगनर ग्रुपला शस्त्रे विकल्याची बातमी आली होती, परंतु रशिया आणि उत्तर कोरियाने या दाव्यांचे खंडन केले होते.

दक्षिण कोरियातील अमेरिकेच्या कारवायांचा रशियाने निषेध केला

रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि किम यांनी नुकतीच एकमेकांना पत्रे लिहिली होती. दोन्ही नेत्यांनी सामरिक सहकार्याचे आवाहन केले होते.

रशियाने या वर्षी दक्षिण कोरियामधील अमेरिकेच्या उपस्थितीवर टीका केली होती. अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने संयुक्त सराव केला होता, ज्याच्या निषेधार्थ रशियाने दीर्घ काळानंतर अमेरिकेवर टीकेचे बाण सोडले होते.

उत्तर कोरियावरील अमेरिकेच्या निर्बंधांना रशिया-चीनने व्हेटो दिला

चीनसह रशियाने उत्तर कोरियावर आण्विक आणि क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे आवाहन केले होते. दोन्ही देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत, ज्यांनी 2006 पासून उत्तर कोरियावर एकूण 11 फेऱ्यांच्या निर्बंधांना मान्यता दिली आहे.

यातच आता, पुतिन यांची उत्तर कोरियाशी जवळीक वाढत असल्याने चीननेही एकत्र येत अमेरिकेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात, रशिया आणि चीनने उत्तर कोरियावर नवीन आर्थिक निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना व्हेटो केला होता.

या वर्षी किमने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र चाचणी घेतली, ज्यावर जागतिक स्तरावर अमेरिकेने टीकाही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

SCROLL FOR NEXT