Russia Vs Ukraine War
Russia Vs Ukraine WarDainik Gomantak

Russia-Ukraine War: 'युद्धाचा शेवटाकडे प्रवास?' झेलेंस्कीचे खळबळजनक वक्तव्य

Russia-Ukraine War: त्या युद्धाचा आज 522 वा दिवस आहे.
Published on

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनचे गेल्या एका वर्षापासून अधिक काळ सुरु असलेले युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले असून दोन्ही देशांनी या युद्धातून माघार घेण्यास नकार दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाचे अतोनात नुकसान होत असून हे युद्ध थांबावे यासाठी विविध पद्धतीने इतर देश प्रयत्न करत आहेत. आता या युद्धाबाबत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, इवानो-फ्रैंकिव्स्क या शहरातून झेलेंस्कीनी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला आहे. हळूहळू हे युद्ध रशियामध्ये परतत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशिया या युद्धाला विशेष सैन्य अभियान असे संबोधतो त्या युद्धाचा आज 522 वा दिवस आहे.

Russia Vs Ukraine War
75 Hard Challenge: अति पाणी प्यायली अन्...! '75 हार्ड' फिटनेस चॅलेंजने टिकटॉकरला थेट पोहचवले रुग्णालयात

युद्धाला सुरुवात झाली तेव्हा रशियाच्या नेतृत्वाला वाटले होते की, ही काही दिवसांची गोष्ट आहे. परंतु तसे झाले नाही आज या युद्धाचा 522 वा दिवस असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर मॉस्कोवर ड्रोन हल्ला केल्याच्या आरोपानंतर झेलेंस्कीनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, युक्रेनने 24 जुलैला रशियावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात अनिवासी इमारतींवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये रक्षा मंत्रालयाच्या जवळच्या इमारतींचा समावेश आहे. 29 जुलै रोजी, ईशान्य युक्रेनच्या सुमी शहरावर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 लोक ठार झाले, तर झापोरिझियावर रॉकेट हल्ल्यात दोन जण ठार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com