Russia Ukraine War: युक्रेन काय मागं सरकत नाही... रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; NATO कडे संशयाची सुई

Russia: मॉस्कोच्या दिशेने निघालेले ड्रोन रशियन हवाई संरक्षणाने पाडले, परंतु रशियाच्या पेस्कोव्ह एअरफील्डवरील हल्ल्यात युक्रेनला मोठे यश मिळाले.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. बुधवार, 30 ऑगस्टच्या रात्री, युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. युक्रेनने एकाच वेळी रशियाच्या सहा भागात ड्रोनने हल्ला केला.

मॉस्कोच्या दिशेने निघालेले ड्रोन रशियन हवाई संरक्षणाने पाडले, परंतु रशियाच्या पेस्कोव्ह एअरफील्डवरील हल्ल्यात युक्रेनला मोठे यश मिळाले.

दरम्यान, युक्रेनने (Ukraine) पेस्कोव्ह विमानतळावर 20 ड्रोनने हल्ला केला. युक्रेनियन हल्ल्यात चार रशियन मिलिट्री ट्रान्सपोर्ट एयरक्राफ्ट- IL 76 नष्ट झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यात एअरफील्डवर उपस्थित असलेल्या एका ऑईल टँकरलाही आग लागली.

हल्ल्यानंतर पेस्कोव्ह विमानतळ लष्करी वापरासाठी बंद करावे लागले. रशियाने केलेल्या तपासानुसार, ब्रिटिश गुप्तचर एजन्सी एमआय 6 ने पेस्कोव्ह एअरफील्डवर हल्ला करण्यासाठी युक्रेनला मदत केली होती.

Russia Ukraine War
Russia- Ukraine War: युक्रेनच्या सैन्याने मिळवली रशियाच्या ताब्यातील महत्वाची जागा

दुसरीकडे, अनेक महिन्यांच्या तयारीनंतर युक्रेनने ब्रिटनच्या (Britain) मदतीने हा हल्ला केला. जेव्हा पेस्कोव्ह एअरफील्डवर चार IL76 विमाने उपस्थित होती, तेव्हा MI6 ने देखील त्याची अचूक इंटेलिजन्स दिली होती.

ब्रिटीश एजन्सीने युक्रेनियन ड्रोनला विमानतळावर पोहोचण्यास मदत केली. यापूर्वी, MI6 या ब्रिटीश एजन्सीने गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी क्रिमिया ब्रिजवर झालेल्या हल्ल्यात मदत केली होती.

नाटोच्या सहभागामुळे क्रेमलिनचा संताप

ज्या रशियन पेस्कोव्ह विमानतळावर हल्ला झाला त्यापासून युक्रेनची सीमा 600 किलोमीटर अंतरावर आहे, तर लॅटव्हियाची सीमा 50 किलोमीटर अंतरावर आहे. नाटो देश एस्टोनियाची सीमा फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे.

रशियन तपास यंत्रणांचे असे मत आहे की, हल्ल्याची तयारी एस्टोनियातून करण्यात आली होती आणि लष्करी विमानांनी पेस्कोव्ह विमानतळाला लक्ष्य केले होते.

गेल्या दीड वर्षांच्या युद्धात पहिल्यांदाच नाटोच्या जमिनीचा थेट हल्ल्यासाठी वापर झाल्याचा संशय आहे. नाटोच्या भूमीवरुन हा हल्ला सिद्ध झाल्यास रशिया आणि नाटो यांच्यात थेट भिडण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

Russia Ukraine War
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चला निघालेल्या नागरिकांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; 7 मृत्यू, 90 जखमी

रशियाने कीववर हल्ला केला

दरम्यान, 30 ऑगस्टच्या रात्री रशियाने कीवसह युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. रशियाने TU55 बॉम्बर्समधून कीववर क्षेपणास्त्रे डागली आणि एकाच वेळी अनेक दिशांनी ड्रोन हल्ले केले.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही काळ्या समुद्रात युक्रेनच्या चार नौकांतील सुमारे पन्नास सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com