russia ukraine conflict russian army Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनच्या रस्त्यांवरील हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

रशियाने युक्रेनच्या 821 लष्करी तळांना टार्गेट केलय

दैनिक गोमन्तक

रशियाच्या लष्कराने युक्रेनच्या लष्करी तळांवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी शनिवारी सांगितले की, लष्कराने लांब पल्ल्याच्या कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रांनी अनेक युक्रेनियन लष्करी तुकड्यांवर हल्ला केला. इतकेच नाही तर निवासी इमारतींचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

युक्रेनची राजधानी कीववर रशियन हल्ल्याचे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत, ज्यावरून तेथील भीषण परिस्थितीचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो. असाच एक व्हिडिओ ब्रिटिश राजकारणी (Politics) हेन्री बोल्टन यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावरही निशाणा साधला आहे.

व्हिडिओमध्ये रशियन सैन्याचे एक बख्तरबंद वाहन रस्त्यावरून जात असलेल्या कारला कसे चिरडते ते पाहिले जाऊ शकते.

रशियाने युक्रेनच्या 821 लष्करी तळांना टार्गेट केले

24 फेब्रुवारीपासून रशियाच्या (russia) हल्ल्याला सुरुवात झाल्यापासून, लष्कराने युक्रेनमधील 821 लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, ज्यात 14 हवाई तळ आणि 19 लष्करी कमांड सेंटर आहेत. यासोबतच 24 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा, 48 रडार, सात युद्ध विमाने, सात हेलिकॉप्टर, 9 ड्रोन, 87 टँक आणि आठ लष्करी जहाजे नष्ट करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT