Kharkiv  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर पुन्हा वाढवले ड्रोन हल्ले, 1 तासात 17 वेळा...!

Kharkiv: रशियन सैन्याने युक्रेनच्या पूर्वेकडील विशेषत: लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रांतांमध्ये जोरदार बॉम्बहल्ला केला.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशियाने पुन्हा युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले वाढवले ​​आहेत. रशियन सैन्याने शुक्रवारी पहाटे पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनच्या पूर्वेकडील विशेषत: लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रांतांमध्ये जोरदार बॉम्बहल्ला केला.

त्याचवेळी, झापोरिझ्झ्यामध्ये, एका तासात 17 वेळा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांसह भयंकर बॉम्बस्फोट झाला. रशियाने खार्किवमध्येही बॉम्बचा वर्षाव केला. यामुळे खार्किव आणि झापोरिझ्झ्या हादरले.

संपूर्ण परिसरात मोठ्याने हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बंकरमध्ये नेण्यात आले. संपूर्ण युक्रेनमध्ये (Ukraine) घबराट पसरली आहे. अनेक इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या

दुसरीकडे, मॉस्कोसमर्थित फुटीरतावादी देखील 2014 पासून लुहान्स्क आणि डोनेत्स्क भागात युक्रेनच्या सैन्याशी लढत आहेत. रशियन हल्ल्याने युक्रेनच्या खार्किव या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे आणि आग्नेय भागातील झापोरोझ्ये येथील ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

तसेच, रशियाच्या (Russia) भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या लष्कराकडून देशाच्या बहुतांश भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले.

त्याचबरोबर, झापोरोझ्ये नगर परिषदेचे सचिव अनातोली कुर्तिएव्ह यांनी सांगितले की, एका तासात 17 वेळा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांसह (Missiles) भयंकर बॉम्बस्फोट झाला.

खाजगी ऊर्जा ऑपरेटर डीटीईकेच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्र हल्ल्याच्या भीतीमुळे कीव शहर आणि निप्रॉपेट्रोव्हस्क प्रदेशांमध्ये वीज खंडित करण्यात आली होती. कीव शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को म्हणाले की, "क्षेपणास्त्र हल्ल्याचा मोठा धोका आहे." महापौर इहोर तेरेखोव्ह म्हणाले की, खार्किवमध्ये अधिकारी बळी आणि नुकसानीची माहिती गोळा करत आहेत. वीज आणि पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT