Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाचा युक्रेनच्या मॉलवर क्षेपणास्त्र हल्ला, 16 ठार, 59 जखमी

रशियाने युक्रेनमधील गजबजलेल्या मॉलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

रशियाने (Russia) युक्रेनमधील (Ukraine) गजबजलेल्या मॉलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला. यामध्ये 16 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 59 जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या आपत्कालीन सेवा प्रमुखांनी या हल्ल्याला दुजोरा दर्शवला आहे. (Russia launches missile attack on Ukrainian mall 16 killed 59 injured)

युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले की, रशियाच्या क्षेपणास्त्राने क्रेमेनचुक शहरातील एका शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. येथे मॉलला Kh-22 अँटी शिप मिसाईलने लक्ष्य करण्यात आले. या घटनेवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांची प्रतिक्रिया समोर आली. युक्रेन मॉलवरील हल्ला पुतिन यांची क्रूरता, रानटीपणा दाखवतो, असे ते यावेळी म्हणाले.

रशिया म्हणाला, रॉकेट बनवले जात होते

त्याचवेळी, रशियन एमओडीकडून असे सांगण्यात आले की मॉस्कोने कीवमधील रॉकेट निर्मिती प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टमसाठी दारूगोळा तयार करण्यासाठी या प्लांटचा वापर केला जात होता.

एक हजारहून अधिक नागरिक मॉलमध्ये असल्याचा दावा

युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. त्यावेळी ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. शॉपिंग सेंटरमध्ये हजाराहून अधिक नागरिक होते. मॉलमध्ये आग लागली बचाव पथक आग विझवत आहेत. बळींची संख्या अकल्पनीय असल्याचे यावेळी झेलेन्स्की म्हणाले.

रशिया आणि युक्रेनमध्ये चार महिने युद्ध सुरू

युक्रेनमधील क्रेमेनचुक हे 2 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. उद्योगांच्या दृष्टिकोनातून क्रेमेनचुक खूप महत्त्वाचे आहे. क्रेमेनचुक हे डनिप्रो नदीच्या काठावर वसलेल आहे. गेल्या 4 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. फेब्रुवारीपासून रशिया युक्रेनवर (Russia Ukraine War) बॉम्बफेक करत आहे. युक्रेनमधील अनेक शहरे युद्धात उद्ध्वस्त झाली आहेत, आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. अनेक निष्पाप लोक यामुळे मारले गेले, हजारो जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT