Russia-Ukraine War  Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाने केलेल्या युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवरील हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

रशियाने पुन्हा नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेनकडून केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दरम्यान, डोनेस्तकमधील क्रॅमतोर्स्क रेल्वे स्टेशनवर रशियन सैन्याने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून 100 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व लोकांची डोनेस्तक येथून सुटका करण्यात येणार होती, मात्र त्यापूर्वी रशियन सैन्याने हल्ला केला.

डोनेस्तकमध्ये अनेक युक्रेनियन नागरिक अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनचे (Ukraine) सैन्य सतत काम करत आहे. मात्र आज पुन्हा बचावकार्य सुरू असताना रशियन क्षेपणास्त्राने सर्व काही उद्ध्वस्त केले. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण युक्रेनच्या मते हा आकडा वाढू शकतो. या हल्ल्यानंतर रशियाने (Russia) पुन्हा नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेनकडून केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना युक्रेन अनेक प्रसंगी रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे दिसते. युक्रेनने पुन्हा एकदा सुमी परिसराचा ताबा घेतल्याचा दावा त्यांच्या बाजूने केला जात आहे. तिथून रशियन सैन्याला हुसकावून लावले आहे. यापूर्वी इरपिनमध्येही युक्रेनच्या लष्कराने आपली ताकद दाखवून रशियाला चोख प्रत्युत्तर दिले होते. तिथेही आता पुन्हा युक्रेनने ताबा मिळवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने (Army) पूर्वेकडील मारियुपोल शहरात सर्वाधिक नरसंहार केला. तेथे सुमारे 5000 लोक मारले गेल्याचे बोलले जात आहे. येथे अनेक सामूहिक कबरीही सापडल्या आहेत. बुचा येथे 400 मृतदेह सापडले आहेत, यातील 120 मृतदेहांची ओळख पटली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT