Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video : 'रशियाने डनिप्रो नदीवरील धरण स्फोटाने उडवले'; युक्रेनचा आरोप

Russia Ukraine War Update: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने दावा केला आहे की, डनिप्रो नदीवर बांधलेले धरण रशियन सैन्याने उडवले आहे.

Ashutosh Masgaunde

वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आता नवे वळण आले आहे. डनिप्रो नदीवर बांधलेले मोठे धरण रशियाने उडवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

ट्विटमध्ये आलेल्या व्हिडीओमध्ये एक धरण फुटल्याचे दिसत आहे, ज्यातून बरेच पाणी वेगाने वाहत आहे. युक्रेनने स्थानिक प्रशासनाला बाधित क्षेत्र लवकरात लवकर रिकामे करण्याचे आणि त्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.

रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील डनिप्रो नदीवर बांधलेले हे धरण उडवल्यामुळे युक्रेनचा आरोप आहे. युक्रेनने डनिप्रो नदीच्या किनारी भागातील रहिवाशांना सखल भागात पुराचा इशारा देत सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

युक्रेनच्या गृह मंत्रालयाने नदीच्या उजव्या काठावरील 10 गावांतील रहिवाशांना आणि खेरसन शहराच्या काही भागांना घरगुती उपकरणे बंद करण्याचे आणि त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आणि पशुधनासह सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. यावेळी प्रशासनाने, दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

"रशियन सैन्याने आणखी एक दहशतवादी कृत्य केले आहे," असे खेरसन प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सकाळी 7 च्या सुमारास टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. धरण फुटले असून, त्यामुळे पाच तासांत पाणी धोकादायक पातळी गाठेल, असा इशारा त्यांनी दिला.

या धरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. धरणातून बाहेर पडणारे पाणी सखल भागाकडे वेगाने वाहत असून नदीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे या व्हिडिओंमध्ये दिसत आहे.

दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, युक्रेनकडे रशियाचा बदला घेण्यासाठी पुरेशी शस्त्रे आहेत. इतकेच नाही तर त्याच्या ऑपरेशनमुळे युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक विजयही मिळेल.

परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी कीवमधील एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, युक्रेनला सध्या सुरू असलेले युद्ध संपेपर्यंत लष्करी आघाडीचे सदस्यत्व मिळणे शक्य होणार नाही. हे युद्ध संपल्यानंतरच शक्य आहे.

युक्रेन आणि रशियाने एकमेकांवर धरण फोडण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप सातत्याने करत असतात. अशातच, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झेलेन्स्की यांनी भाकीत केले होते की रशिया हे धरण नष्ट करेल, ज्यामुळे पूर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT