New Party Of Sachin Pilot: पायलट स्थापन करणार नवी 'काँग्रेस' ? ‘हे’ आहे पक्षाचे नाव

Rajasthan Politics: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी सचिन पायलट आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात.
Pragatishil Congress
Pragatishil CongressDainik Gomantak
Published on
Updated on

New Party In Rajasthan : राजस्थानमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ नव्या दिशेने जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडच्या हस्तक्षेपानंतरही सचिन पायलट समाधानी नसून आता ते स्वतःचा पक्ष काढणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन पायलट 11 जूनला त्याचे वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीला नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. चर्चेनुसार राजस्थानमध्ये दोन नवीन पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी एका पक्षाचे नाव 'प्रगतशील काँग्रेस' असे आहे. सचिन पायलटने हे पाऊल उचलले तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.

अलीकडेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्याशी दीर्घ बैठक घेतली. बैठकीनंतर केसी वेणुगोपाल यांनी आता सर्व काही ठीक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.मात्र, दोन दिवसांतच हा दावा उघड होऊ लागला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे वक्तव्य सचिन पायलट यांनी केले. त्याचवेळी अशोक गेहलोत यांच्या वृत्तीवरून हे दोन्ही नेते एकत्र येण्यास अजिबात तयार नाहीत, असे दिसते.

नाव निश्चित झाले आहे, फक्त घोषणेची प्रतीक्षा

सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये पदयात्रा सुरू केली, त्याचवेळी ते आपला नवा पक्ष काढणार असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांची एक टीम सचिन पायलटसोबत काम करत असून त्यानुसार ते आपली रणनीतीही बनवत आहेत.

वारंवार विनंती करूनही सचिन पायलट यांच्या मागण्या मान्य केल्या जात नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.

Pragatishil Congress
US: 'भारत एक जीवंत लोकशाही, दिल्लीत जा अन् ',PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकनने केलं भारताचं कौतुक

अहवालानुसार दोन नवीन राजकीय पक्षांची नोंदणीही नुकतीच करण्यात आली आहे. 11 जून रोजी वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त सचिन पायलट दौसा येथूनच आपल्या नव्या पक्षाची औपचारिक घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत त्यांच्यासोबत किती आमदार जातात हे पाहावे लागेल. निवडणुकीच्या वर्षात सचिन पायलटचे हे पाऊल काँग्रेससाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Pragatishil Congress
Alert: अनोळखी नंबरवरील फोन टाळा! मोदी सरकारचा भारतीयांना सल्ला

घडामोडींवर काँग्रेसचे लक्ष

सचिन पायलट कोणत्याही परिस्थितीत पक्षाबाहेर जाऊ शकत नाही, असे आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाला वाटत होते, मात्र नव्या स्थितीत पक्षाचे हायकमांड त्याच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेवून आहे.

सचिन पायलट यांच्या या खेळीमुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

राजस्थानमधील गेल्या विधानसभा निवडणुका सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या. यावेळी पायलट बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री होतील असे बोलले जात होते, मात्र तसे झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com